Corona Crisis: राज्यात झपाट्याने पसरत असलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दक्षिण गोवाही भरडून निघत आहे. पण मडगावात उपचार करण्याची कुठलीही सोय नसल्याने रुग्णांची परवड होऊ लागली आहे. मडगावचे जिल्हा इस्पितळ (District Hospital) कोरोना रुग्णांसाठी (Corona Patients) बंद केल्याने ज्येष्ठ नागरिक रुग्णांचे हाल होत आहेत.
वयाची सत्तरी ओलांडलेल्या दाम्पत्याला जिल्हा इस्पितळात तपासणीसाठी आणले. त्यांना कोरोना (Corona) झाल्याचे निष्पन्न झाल्यावर गोमेकॉत (GMC) हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, त्यांना मडगावातून (Margao) गोमेकॉत घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याने ताटकळत राहावे लागले. हे दाम्पत्य अन्य व्याधींनीही ग्रासले होते.
यासंदर्भात जिल्हा इस्पितळ प्रशासनाशी संपर्क साधला असता जिल्हा इस्पितळात कोरोनासाठी ओपीडी खुली आहे. मात्र, कुठल्याही रुग्णांना येथे भरती करून घेतले जात नाही, त्यांना गोमेकॉत भरती केले जाते असे सांगण्यात आले. गोमेकॉच्या नवीन ब्लॉकमध्ये कोरोना रुग्ण ठेवले जात असून तिथे 580 खाटांची सोय करण्यात आली आहे. जोपर्यंत या इस्पितळात भरती केलेल्या रुग्णांची संख्या 300 जात नाही तोपर्यंत या रुग्णांवर गोमेकॉतच उपचार केले जातील असे सांगितले गेले. सध्या गोमेकॉत सुमारे 70 रुग्णांवर उपचार चालू आहेत. ही संख्या 300 वर गेली तर कोविड रुग्णांना म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात येणार असून त्यानंतर गरज पडलीच तर दक्षिण जिल्हा इस्पितळात उपचार सुरू होतील असे सांगण्यात आले.
भाजपच्या (BJP) एका प्रमुख नेत्याचे आई-वडिल कोरोनाबाधित असता दक्षिण गोव्यात एकही सरकारी इस्पितळ उपलब्ध नसल्याने त्यांची हेळसांड झाली. दक्षिण गोव्यातील रुग्णांनाही पणजीत गोमेकॉमध्ये जायला सांगणे हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे. मडगावच्या जिल्हा इस्पितळात ताबडतोब कोरोना विभाग सुरू करावा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
शनिवारी सायंकाळी दक्षिण गोव्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येने 300 हजारांचा आकडा पार केला होता. दक्षिण गोव्यातील काणकोण, सांगे येथील टोकाच्या तालुक्यातील रुग्णांना उपचारासाठी बांबोळीला जावे लागणे अन्यायकारक आहे. त्यांच्यावर दक्षिण गोव्यातच उपचार करण्याची सोय ताबडतोब सुरू करावी, अशी प्रतिक्रिया प्रतिमा कुतिन्हो, उपाध्यक्ष, आप यांनी व्यक्त केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.