नाट्यगायक रामदास कामत निवर्तले

गोमंतकीय सूर हरपला, ख्यातनाम नाट्यगायक, अभिनेता रामदास कामत यांचे मुंबईत निधन
veteran singer Ramdas Kamat dies in Mumbai
veteran singer Ramdas Kamat dies in MumbaiDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी : ख्यातनाम नाट्यगायक, अभिनेता रामदास कामत (Ramdas Kamat) यांचे मुंबईत रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. 18 फेब्रुवारी रोजी ते 91 व्या वर्षात पदार्पण करणार होते. ‘मत्सगंधा’मधील त्यांची भूमिका विलक्षण गाजली होती. या नाटकाने संगीत रंगभूमीला पुनर्वैभव प्राप्त करून दिले. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कामत यांनी 18 नाटकांमध्ये काम केले. त्यांच्या निधनामुळे गोमंतकीयांनी शोक व्यक्त केला आहे.

veteran singer Ramdas Kamat dies in Mumbai
माई म्हणाली... 'माझ्या मुलांना सांभाळा'

विलेपार्ले येथील निवासस्थानी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा डॉक्टर कौस्तुभ कामत, सून डॉ संध्या कामत आणि नातू अनिकेत आणि नातसून असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी पारसीवाडा स्मशान भुमी अंधेरी पुर्व येथे होणार आहे.

veteran singer Ramdas Kamat dies in Mumbai
Goa Police: निवडणुकीच्या तोंडावर गोवा पोलिसांचं बदलीसत्र

रामदास कामत गोव्याचे सुपुत्र होते. त्यांचा जन्म म्हापसा येथे दि. 18 फेब्रुवारी 1931 रोजी झाला होता. 1938 साली साखळीला पुराचा मोठा फटका बसला, तेव्हा मदतनिधीसाठी आयोजित नाटकात त्यांनी पहिल्यांदा भूमिका केली आणि दोन पदेही सादर केली होती. कामत यांचे नुसते नाव रसिकांच्या कानावर जरी आले, तरी जुन्या आणि नव्या गायकांच्या मनात त्यांच्या अजरामर गीतांची मालिका आजही उभी राहते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com