Goa Agriculture: गोव्यात झेंडू शेतीला बहर! 150 हेक्टरवर लागवड, 200 टन उत्पादनाचा अंदाज

Marigold Farming Growth in Goa: गोवा राज्य कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, झेंडू लागवडीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Marigold Farming Growth in Goa
Goa AgricultureDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा राज्य कृषी क्षेत्रात स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी सरकारकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, झेंडू लागवडीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पूर्वी राज्यात १० ते २० हेक्टर क्षेत्रावर होणारी झेंडूची लागवड गेल्या चार-पाच वर्षांत वाढून यंदा सुमारे १५० हेक्टरवर पोहोचली आहे. यंदा राज्यात १५० ते २०० टन झेंडूच्या फुलांचे उत्पादन अपेक्षित असल्याची माहिती कृषी संचालक चंद्रहास देसाई यांनी दिली.

कृषी विभागाने इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून स्थानिक पातळीवर तयार केलेली सुमारे पाच लाख झेंडूची रोपे यंदा शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वितरित केली आहेत. या रोपांची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता चांगली असल्याने शेतकऱ्यांना यंदा समाधानकारक उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. पुढील वर्षी मागणीनुसार रोपांची उपलब्धता करून देण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले.

Marigold Farming Growth in Goa
Goa Land Zoning: गोव्यातील सेर्नाभाटी, कोलव्यातील 12.74 लाख चौ. मीटर जमीन 'अविकासयोग्य'; सरकारची मंजुरी

राज्यातील काही भागांत झेंडूचे उत्पादन सुरू झाले असून, स्थानिक बाजारपेठेत फुलांची खरेदीही वाढली आहे. नवरात्रोत्सव आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलांना मोठी मागणी आहे. झेंडूच्या लहान हारांना ५० ते ६० रुपये, तर फुलांना प्रतिकिलो १५० ते २०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत आहे.

हेक्टरी ७५ हजारांचे अनुदान

‘स्वयंपूर्ण गोवा’ उपक्रमांतर्गत झेंडूची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून प्रति हेक्टर ७५ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. सणासुदीच्या काळात स्थानिक फुलांना मिळणारी पसंती आणि वाढती मागणी यामुळे झेंडूची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून, दसरा-दिवाळीत त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

Marigold Farming Growth in Goa
Goa Water Conservation: उधळपट्टी टाळू, उद्यासाठी पाणी वाचवू! गोव्याच्या जलसुरक्षेसाठी प्रत्येक थेंबाचा हिशेब हवा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com