Marathi Official Language: मराठी राजभाषेसाठी केंद्राने राज्‍याला सूचित करावे! साहित्‍य संमेलनात ठरावाद्वारे मागणी

Marathi Rajbhasha Sahitya Sammelana: गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने गोवा सरकारला सूचित करावे, अशी मागणी आज साखळी येथे झालेल्‍या मराठी राजभाषा साहित्‍य संमेलनात ठरावाद्वारे करण्‍यात आली.
Marathi Rajbhasha Sahitya Sammelana
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

Marathi Rajbhasha Sahitya Sammelana Sanquelim

साखळी: गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारने गोवा सरकारला सूचित करावे, अशी मागणी आज साखळी येथे झालेल्‍या मराठी राजभाषा साहित्‍य संमेलनात ठरावाद्वारे करण्‍यात आली.

गोव्यात कोकणी राजभाषा असली तरी मराठीला कधीच दुय्यम स्थान दिलेले नाही. दोन्ही भाषांना समान दर्जा आहे. गोव्यात लोक कोकणी बोलतात, मराठी वाचतात आणि लिहितात. त्यामुळे दोन्ही भाषांचे स्थान व महत्त्व अबाधित आहे. भविष्यात भावी पिढी निर्मितीच्या दृष्टीने सर्व साहित्यिकांनी एकत्रित येऊन कोकणी व मराठीतील साहित्यिक निर्माण करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

साखळीतील मराठी राजभाषा साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते. मराठी असे आमुची मायबोली आणि गोमंतक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने साखळीतील श्री राधाकृष्ण मुरलीधर संस्थान सभामंडपात आयोजित केलेल्या दुसऱ्या मराठी राजभाषा साहित्य संमेलनाच्या उदघाटन सोहळ्यात मुख्यमंत्री सावंत बोलत होते.

यावेळी कै. गुरूनाथ नाईक सभागृहात व्यासपीठावर माजी आमदार नरेश सावळ, संमेलनाध्यक्ष साहित्यिक पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर आणि मान्यवर उपस्थित होते.

Marathi Rajbhasha Sahitya Sammelana
Marathi Rajbhasha Sahitya Sammelan: दुसरे 'मराठी राजभाषा साहित्य संमेलन' होणार साखळी येथे! अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी आग्रही भूमिका मांडली जाणार

मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप

मराठी भाषा ही विचारांची व समृद्धीची पालखी आहे. ही पालखी निरंतर समृद्ध करूया. मराठीतील लोकगीतांचे धन आपल्याकडे आहे. त्यांचे वाचन केल्यास गोव्यातील मरठीची समृद्धता लक्षात येते. गोव्यातील मराठीप्रेमींनी या भाषेसाठी किती संघर्ष केला हे लक्षात येईल, असे संमेलनाध्यक्ष प्रा. राजेंद्र केरकर संमेलनाच्या समारोप सोहळ्यात म्हणाले. मराठी भाषेत लिहिणारी, वाचणारी व विचार करणारी माणसे निर्माण झाली तरच मराठी भाषा जीवंत राहील, असे केरकर म्हणाले.

Marathi Rajbhasha Sahitya Sammelana
Goa Marathi Language: 'मराठी भाषा घराघरांत, मंदिरांत गेली पाहिजे'; गोवा मराठी अकादमीच्या उपाध्यक्षांना असं का वाटते?

अन्‍य ठराव असे...

सरकारी कार्यालयांमध्‍ये मराठी भाषेत फलक हवेत

दोन्‍ही विमानतळांवर मराठी भाषेत उद््घोषणा हव्‍यात

मराठी संस्थांना ‘कोकणी’ एवढे अनुदान द्यावे

मराठी शाळांच्‍या समस्या त्‍वरित सोडवाव्यात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com