Goa Marathi Language: 'मराठी भाषा घराघरांत, मंदिरांत गेली पाहिजे'; गोवा मराठी अकादमीच्या उपाध्यक्षांना असं का वाटते?

Marathi Sahity Sanskrutik Sammelana Brahmakarmali: गोवा मराठी अकादमी सत्तरी तालुका प्रभागातर्फे ब्रह्माकरमळी-सत्तरी येथील श्री ब्रह्मदेव देवस्थान सभामंडपात आयोजित मराठी साहित्य आणि सांस्‍कृतिक संमेलनाचे उद्‌घाटन झाले.
Marathi Sahity Sanskrutik Sammelana Brahmakarmali
Marathi Sahity Sanskrutik Sammelana Brahmakarmali Dainik Gomantak
Published on
Updated on

Marathi Sahitya Sanskrutik Sammelana Brahmakarmali 2025

वाळपई: गोव्यातील लोकांनी मराठी भाषेवर फार प्रेम केले आहे. गावागावांत या भाषेचे संवर्धन केले. त्यामुळे मराठी भाषेला मोठे स्थान प्राप्त झाले आहे. भविष्यातही मराठी भाषा तनामनात कायम राहण्यासाठी कार्य गरजेचे आहे. मराठी भाषेसाठी असलेली तळमळ, प्रेम हे कार्यातून दिसले पाहिजे. मराठी भाषा घराघरांत, मंदिरांत गेली पाहिजे, असे प्रतिपादन गोवा मराठी अकादमीचे उपाध्यक्ष चंद्रकांत कृष्णा गावस यांनी केले.

गोवा मराठी अकादमी सत्तरी तालुका प्रभागातर्फे ब्रह्माकरमळी-सत्तरी येथील श्री ब्रह्मदेव देवस्थान सभामंडपात आयोजित मराठी साहित्य आणि सांस्‍कृतिक संमेलनाच्‍या उद्‌घाटन कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष म्‍हणून गावस बोलत होते.

यावेळी पं. महादेव शास्त्री जोशी व्यासपीठावर अकादमीचे संचालक चंद्रकांत महादेव गावस, उद्‌घाटक माजी उपसभापती नरहरी हळदणकर, कार्याध्यक्ष सखाराम देसाई, सत्तरी विभाग अध्यक्ष म्हाळू गावस, संयोजक मिलिंद गाडगीळ, सचिव गणपतराव राणे, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, नगरगाव सरपंच ऊर्मीला गावस, अकादमीचे संचालक आनंद मयेकर, पुजारी संदीप केळकर, रामकृष्ण गावस, स्वागताध्यक्ष वामनराव देसाई उपस्थिती होते.

Marathi Sahity Sanskrutik Sammelana Brahmakarmali
Gomantak Marathi Academy: मराठीच्या वाटेला जाण्‍याचा प्रयत्‍न करु नका... दामोदर मावजोंच्‍या वक्तव्‍याचा गोमंतक मराठी अकादमीकडून निषेध

उद्‌घाटक नरहरी हळदणकर म्हणाले, गावागावांत मराठी अकादमीचे कार्य जोमाने सुरू आहे. अनेक माणसे त्यातून जोडली गेली आहेत. संमेलने माणसांना व्यासपीठ देण्याचे माध्यम आहे.

प्रा. अनिल सामंत प्रास्ताविक करताना म्हणाले की, आजच्या संमेलनात दिंडीतून भक्तिमय वातावरणात बनले. मराठीसाठी जगू आणि मरू हाच ध्यास आहे. त्यासाठी ठिणगी पडली पाहिजे. पं. महादेव जोशींचे स्मारक बांधावे हा विचार आहे.

दरम्‍यान, सकाळी आंबेडेतील श्री शांतादुर्गा मंदिराकडून ग्रंथदिंडी काढण्यात आली. मुलांनी ईशस्तवन व श्री गणेशवंदना सादर केली.

Marathi Sahity Sanskrutik Sammelana Brahmakarmali
Marathi Rajbhasha Sahitya Sammelan: दुसरे 'मराठी राजभाषा साहित्य संमेलन' होणार साखळी येथे! अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी आग्रही भूमिका मांडली जाणार

न्यायाधीश, पत्रकारांचा हृद्य सत्कार

मराठी भाषेतून शिक्षण घेऊन उंच शिखर गाठलेल्या वाळपईच्या न्यायाधीश अक्षता काळे मोघे, पत्रकार सपना सामंत, दशरथ मांद्रेकर, उदय सावंत यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन संमेलनात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्कार करण्यात आला. न्यायाधीश अक्षता काळे मोघे यांनी मनोगत व्यक्त करताना आपण मराठी भाषेतून शिकून या पदापर्यंत पोहोचल्‍याचा अभिमान असल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com