Market Fire Safety: म्हापसा बाजारातील पाचही फायर हायड्रन्ट बंद; अग्निसुरक्षा व्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर

Non Functional Fire Hydrants: वास्को येथील संडे मार्केटमधील भीषण आग दुर्घटनेनंतर म्हापसा बाजारपेठेतील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Non Functional Fire Hydrants
Market Fire SafetyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

म्हापसा: वास्को येथील संडे मार्केटमधील भीषण आग दुर्घटनेनंतर म्हापसा बाजारपेठेतील अग्निसुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अग्निशामक दल आणि म्हापसा पालिकेच्या संयुक्त पाहणीत बाजारपेठेतील पाचही फायर हायड्रन्ट नादुरुस्त असल्याचे उघड झाले.

त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत आग विझवण्यासाठी पाण्याची उपलब्धता कशी होणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मंगळवारी झालेल्या पाहणीत अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर, साहाय्यक विभागीय अधिकारी बॉस्को फेर्राव, स्टेशन अधिकारी गणेश गोवेकर आणि पालिकेचे कनिष्ठ अभियंता सुभा आमोणकर उपस्थित होते.

Non Functional Fire Hydrants
Goa Weather: नरकासुरांच्या तयारीवर अवकाळी पावसाचे पाणी; पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता

पाहणीपूर्वी पालिकेने हायड्रन्टभोवती विक्रेत्यांनी ठेवलेले सामान हटवून परिसर मोकळा केला. मात्र, प्रत्यक्ष चाचणीत पाचही हायड्रन्ट बंद असल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी अशा पाहणीवेळी उपजिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पेयजल विभागाच्या अधिकाऱ्यांना सहभागी करून घेतले जात होते. यावेळी मात्र त्यांना डावलण्यात आले. त्यामुळे पाहणीच्या प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, अग्निशामक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यापूर्वी म्हापशात सेवा बजावली असतानाही हायड्रन्ट दुरुस्तीसाठी आवश्यक पाठपुरावा का झाला नाही, असा सवाल व्यापारी वर्गातून होत आहे. दुर्घटनेनंतर जागे होण्याऐवजी प्रशासनाने आधीच अग्निसुरक्षा यंत्रणा सक्षम करावी, अशी मागणी होत आहे.

Non Functional Fire Hydrants
Goa Politics: भाजप-मगो युती कायम राहणार की जागावाटपात बदल होणार? दामू नाईक म्हणाले, 'मतभेद नाहीत'!

तातडीने दुरुस्तीच्या सूचना!

अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर यांनी सांगितले की, वास्को दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व बाजारपेठांच्या अग्निसुरक्षेचा आढावा घेतला जात आहे. सुरक्षेतील त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित नगरपालिकांना सूचना दिल्या जात आहेत. आणीबाणीच्या वेळी पाण्याअभावी आग विझवण्यात विलंब होऊ नये, यासाठी स्थानिक यंत्रणा सक्षम असणे आवश्यक आहे. म्हापसा बाजारातील पाचही फायर हायड्रन्ट बंद असल्याने ते तातडीने दुरुस्त करून सेवायोग्य करावेत, अशा सूचना पालिका अधिकाऱ्यांना दिल्याचे रायकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.