Goa Weather: नरकासुरांच्या तयारीवर अवकाळी पावसाचे पाणी; पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता

Goa Unseasonal Rain: नरकासुर प्रतिमा तयार करण्याची लगबग सुरू असतानाच अवकाळी पावसाने या तयारीत व्यत्यय आणला आहे.
Goa Unseasonal Rain
Goa WeatherDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: नरकासुर प्रतिमा तयार करण्याची लगबग सुरू असतानाच अवकाळी पावसाने या तयारीत व्यत्यय आणला आहे. प्रतिमांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी अनेक ठिकाणी त्यांना प्लास्टिक ताडपत्रीने झाकण्यात येत आहे. मंगळवारी रात्री ७ च्या सुमारास पणजी परिसरातही पावसाने हजेरी लावली.

मुरासू चक्रीवादळाच्या प्रभावामुळे गेल्या दोन दिवसांत राज्याच्या काही भागांत तुरळक पाऊस झाला. त्याचा सर्वाधिक फटका सत्तरी तालुक्याला बसला. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सुमारे १२ ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या. शेळपे, नानेली आणि भुपईपाला येथे फणस, आंबा तसेच नारळाची झाडे पडली.

Goa Unseasonal Rain
Goa Politics: भाजप-मगो युती कायम राहणार की जागावाटपात बदल होणार? दामू नाईक म्हणाले, 'मतभेद नाहीत'!

या घटनांनंतर अग्निशमन दलाने तातडीने मदतकार्य केले. पुढील तीन दिवस राज्यात तुरळक पावसाची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. गेल्या २४ तासांत धारबांदोडा येथे १० मिमी, वाळपई येथे ८ मिमी, साखळी येथे ७ मिमी आणि फोंडा येथे ४ मिमी पावसाची नोंद झाली. मुरगाव, जुने गोवे, पणजी आणि दाबोळी परिसरातही तुरळक पाऊस झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.