Goa Politics: 'काँग्रेस थर्ड क्लास, चारित्र्यहीन पार्टी'; वडिलांचे खोटे पोस्टर व्हायरल केल्याचा आरोप करत मनोज परब यांचा हल्लाबोल

Manoj Parab Slams Congress: राज्याचं राजकारण पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे तापल्याचं चित्र आहे. रिव्होल्युशनरी गोवन्स (RGP) पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी थेट काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.
Manoj Parab
Manoj ParabDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्याचं राजकारण पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे तापल्याचं चित्र आहे. रिव्होल्युशनरी गोवन्स (RGP) पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी थेट काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. परब यांनी फेसबुकवर एक पोस्ट करत काँग्रेस समर्थकांवर आपल्या वडिलांचे बनावट पोस्ट तयार करून व्हायरल केल्याचा आरोप करत टिका केलीय.

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर काँग्रेस समर्थक बनावट पोस्टर पसरवत असल्याचा आरोप करत त्यांनी संताप व्यक्त केला.“बनावट पोस्टर्स तुमच्या काही उपयोगाचे नाहीत. दुसरे काहीतरी करून पाहा. माझ्या वडिलांना या घाणेरड्या राजकारणात ओढू नका,” अशा शब्दांत त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे काँग्रेसवर टीका केलीय.

Manoj Parab
Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

मनोज परब यांनी आरोप केला की, काँग्रेस समर्थक फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप ग्रुप्सवर बनावट पोस्टर्स पसरवत आहेत. हा अत्यंत लाजीरवाणा प्रकार आहे. बनावट पोस्टर्स तुमच्या काही उपयोगाचे नाहीत. दुसरे काहीतरी करून पाहा. माझ्या वडिलांना या घाणेरड्या राजकारणात ओढू नका," अशी पोस्ट करत मनोज परब यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

Manoj Parab
Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

या प्रकरणी सोशल मीडियावरून राजकीय वातावरण तापले असून, दोन्ही पक्षांत शाब्दिक चकमकी सुरू आहेत. परब यांच्या फेसबुक पोस्टमुळे आता या प्रकरणाला आणखी राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com