Goa Politics: काँग्रेस 'युरीं'च्‍या पाठीशी ठाम! माणिकराव ठाकरेंचे प्रतिपादन; गोवा फॉरवर्डने संपवला विषय

Manikrao Thakare: आलेमाव यांनी घेतलेल्‍या भूमिकेला काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. तर, दुसरीकडे गोवा फॉरवर्डने आपल्‍यासाठी हा विषय संपल्‍याचे जाहीर केले आहे.
Manikrao Thakare, Yuri Alemao
Manikrao Thakare, Yuri AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभेच्‍या नुकत्‍याच झालेल्‍या अर्थसंकल्‍पीय अधिवेशनाच्‍या अखेरच्‍या दिवशी सभागृहात घडलेल्‍या घटनेनंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी घेतलेल्‍या भूमिकेला काँग्रेस प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी पूर्ण पाठिंबा दिला आहे. तर, दुसरीकडे गोवा फॉरवर्डने आपल्‍यासाठी हा विषय संपल्‍याचे जाहीर केले आहे.

फोंडा पोटनिवडणुकीसाठी दक्षिण गोव्‍यात आचारसंहिता जाहीर झाल्‍यामुळे सरकार अर्थसंकल्‍पीय अधिवेशन पुढे सुरू ठेवू शकते का? असा प्रश्‍‍न उपस्‍थित करीत आमदार विजय सरदेसाई यांनी सरकारने चार महिन्‍यांसाठी लेखानुदान मंजूर करून घ्‍यावे व आचारसंहितेनंतर पुन्‍हा अधिवेशन बोलवावे, अशी मागणी केली होती.

तरीही मुख्‍यमंत्री सावंत संपूर्ण अर्थसंकल्‍पास मान्‍यता घेण्‍याच्‍या आपल्‍या भूमिकेवर ठाम राहिल्‍याने विरोधात असलेल्‍या काँग्रेसच्‍या तीन, ‘आप’च्‍या दोन आणि ‘आरजी’च्या एका आमदाराने सभापती गावकर यांच्‍यापुढे हौदात गदारोळ माजवला. त्‍यामुळे सभापतींनी या सहा आमदारांना मार्शलमार्फत सभागृहातून बाहेर काढले. तेव्हा सरदेसाईंनी विरोधकांना साथ न देता मागणीवर स्‍पष्‍टीकरण देण्‍यासाठी आपल्‍या जागीच उभे राहणे पसंत केले.

त्‍यामुळे संतप्‍त विरोधी पक्षनेते युरी यांनी सरदेसाईंवर ‘सेटिंग’चा आरोप केला. त्‍यावरून आक्रमक फॉरवर्डनेही युरींवर टीकास्र सोडत, सोमवारी राज्‍य कार्यकारिणी बैठकीत विधानसभेच्या २५ जागा लढवण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यामुळे निवडणुकीत या दोन पक्षांची युती राहणार की नाही? असा प्रश्‍‍न उद्‌भवला होता. त्‍यावर मंगळवारी स्‍पष्‍टीकरण देत काँग्रेस प्रभारी ठाकरे यांनी युरींच्‍या भूमिकेचे समर्थन केले. तर, फॉरवर्डने हा विषय आपल्‍यासाठी संपला आहे, असे जाहीर केले.

Manikrao Thakare, Yuri Alemao
Goa Assembly Session: 'अर्थसंकल्प आकड्यांचा खेळ नसून राज्याचे आर्थिक नियोजन'! CM सावंतांनी ठणकावले; काल विधानसभेत काय घडले? वाचा..

काय म्‍हणाले माणिकराव ठाकरे?

फोंडा पोटनिवडणुकीच्‍या आचारसंहितेमुळे अर्थसंकल्‍पीय अधिवेशन मध्‍येच थांबवण्‍यात आले. त्‍यामुळे विरोधी आमदारांना आपले प्रश्‍‍न, जनतेच्‍या समस्‍या मांडता आल्‍या नाहीत.

सरकारने अधिवेशन न थांबवता ते सुरू ठेवावे, अशी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची मागणी होती आणि ती रास्‍तच होती. त्‍यासाठी आम्‍ही युरी आलेमाव यांचे समर्थन करतो. काँग्रेस त्‍यांच्‍या पाठिशी ठामपणे उभी आहे.

Manikrao Thakare, Yuri Alemao
Goa Politics: खरी कुजबुज; जिंकणाऱ्यांकडेच पक्षाचे लक्ष

त्‍या दिवशी झालेल्‍या गदारोळात विजय सरदेसाई सभागृहात थांबून राहिले. त्‍यामुळे युरींनी त्‍यांच्‍याबाबत जे शब्‍द वापरले ते चुकीचे होते, हे मी याआधीही स्‍पष्‍ट केलेले आहे.

विरोधी पक्षांच्‍या आमदारांनी एकमेकांबाबत अपशब्‍द वापरू नये, हीच माझी अपेक्षा आहे. युरी आणि विजयमध्‍ये झालेल्‍या वादाचा काही राजकीय पक्ष गैरफायदा घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com