Goa CM Pramod Sawant: मुख्यमंत्री प्रमोद सावंत 3 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर; मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेला पुन्हा उधाण

Goa Politics: मंत्रिमंडळातून कोणाला वगळले जाईल आणि कोणाला स्थान मिळेल याचे अंदाज गेले वर्षभर वर्तवण्यात येत असले तरी भाजपकडून यावर मौन पाळले गेले आहे.
Goa CM Delhi Visit
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर उद्या (ता. २३) रवाना होणार आहेत. ते २६ रोजी राज्यात परत येतील. मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार निती आयोग, मुख्यमंत्री परिषद याशिवाय अन्य गाठीभेटींच्या निमित्ताने हा मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा आहे.

महाराष्ट्रात मंत्रिमंडळात फेरबदलास भाजप पक्षश्रेष्ठींनी परवानगी दिल्याने गोव्यासाठीही तशी परवानगी मिळू शकते, अशी चर्चा सुरू झाली आहे. गेला महिनाभर बंद असलेल्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेने या दिल्ली दौऱ्याच्या माहितीसोबत उसळी घेतली आहे. मंत्रिमंडळातून कोणाला वगळले जाईल आणि कोणाला स्थान मिळेल याचे अंदाज गेले वर्षभर वर्तवण्यात येत असले तरी भाजपकडून यावर मौन पाळले गेले आहे.

Goa CM Delhi Visit
Goa Fraud: प्रदूषण नियंत्रण मंडळाला लाखोंचा चुना! 'तोतया' अधिकाऱ्याकडून फसवणुकीचे सत्र सुरूच; पोलिस खाते अपयशी

एक वर्षापासून रखडला मंत्रिमंडळाचा फेरबदल

गोवा मंत्रिमंडळात फेरबदल होणार याबाबत गेल्या एक वर्षापासून चर्चा सुरु आहेत. सुरुवातीला लोकसभेच्या निवडणुका आणि त्यानंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमुळे पक्षश्रेष्ठी व्यस्त असल्याने या चर्चा मागे पडत गेल्या. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी सभापती रमेश तवडकरांनी १५ दिवसांत याबाबत निर्णय होणार असल्याचे भाष्य केले होते. पण, अद्याप त्याबाबत काहीच फैसला झाल्याचे दिसत नाही.

Goa CM Delhi Visit
Goa Rain: लाखोंचे आर्थिक नुकसान! मुसळधार पावसामुळे घरे-झाडांवर संक्रांत, वाहनांची हानी, वीज खात्यालाही मोठा फटका

छगन भुजबळांनी घेतली शपथ

फडणवीसांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळांनी अखेर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. सरपंच संतोष देशमुख प्रकरणामुळे अडचणीत सापडल्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता छगन भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.

मात्र अद्याप त्यांना कोणत्याही खात्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही. महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडीमुळे गोव्यातील देखील संभाव्य फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com