Goa Election: विविध पक्षांचे 150 हून अधिक 'स्टार प्रचारक' येणार गोव्यात

नरेंद्र मोदी, प्रियांका, ममता, शरद पवार होणार प्रचारात सहभागी
Rahul Gandhi and Narendra Modi
Rahul Gandhi and Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आता केवळ बोटावर मोजण्याइतके दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे  सत्ताधारी भाजप, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड, आम आदमी पक्ष, तृणमूल-मगोप, राष्ट्रवादी- शिवसेना, रिव्होल्युशनरी गोवन्ससह अनेकांची लगबग वाढली असून प्रचाराचा वेग आला आहे. प्रचारावरील निर्बंधात सवलत मिळाल्याने लवकरच राष्‍ट्रीय पातळीवरचे नेते गोव्यात येत आहेत. त्यामुळे येत्या आठवड्याभरात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाणार असून विविध प्रकारच्या टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप गोवेकरांना ऐकायला मिळतील. (Goa Election News)

Rahul Gandhi and Narendra Modi
गोवा निवडणुकीत मतदान करण्यावरुन ज्येष्ठ नागरिकांच्या मनात संभ्रम

देशभरात गोव्यासह उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर येथे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच निवडणूक आयोगाने प्रचारासाठीचे निर्बंध शिथिल केले आहेत. तीन दिवसांपूर्वी आयोगाने सभेला १ हजार जणांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे पाचही राज्यात प्रचारकार्य जोमात सुरू झाले आहे.

150 हून अधिक स्टार प्रचारक येणार गोव्यात

प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी, स्मृती इराणी, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह सुमारे १५० हून अधिक बडे नेते स्टार प्रचारक म्हणून आपापल्या पक्षाच्या प्रचारात सहभागी होणार आहेत.

काँग्रेस प्रथमच आक्रमक

2017 ला हातातील सत्ता गेल्याचे शल्य असणाऱ्या काँग्रेसने यंदा प्रचारामध्ये आक्रमक भुमिका घेतली आहे. काँग्रेस 37 जागा लढवत असून 3 जागा फॉरवर्डला दिल्या आहे. विधानसभा प्रचाराची धुरा दिनेश गुंडूराव, पी.चिदंबरम आणि अलका लांबा यांच्यावर सोपवली असून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक नेते प्रत्यक्ष प्रचारांमध्ये सहभागी होत आहेत.

राष्ट्रवादी-सेनेची तयारी

राष्ट्रवादी आणि शिवसेनेला (Shiv Sena) काँग्रेसने हात दाखवल्याने दोघांनीही प्रत्येकी 12 असे 24 उमेदवार उभे केलेत. प्रचारासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, धनंजय मुंडे हे मंत्री तर शिवसेनेच्या वतीने मंत्री आदित्य ठाकरे, उदय सामंत, ऊर्मिला मातोडकर, आदेश बांदेकर आपल्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत.

आपची यंत्रणा जोमात: विधानसभा निवडणुकीचे नियोजन करण्यामध्ये आप यशस्वी ठरली आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून आपची टीम राज्यभर कार्यरत आहे. मात्र प्रचाराची धुरा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, आमदार आतिशी यांच्यावर आहे. सध्या त्यांनी आक्रमक प्रचाराला सुरुवात करत अनेक आश्वासने गोवेकरांना दिली आहेत.

Rahul Gandhi and Narendra Modi
गोवा निवडणुकीनंतर आमचे आमदार थेट राजभवनातच शपथ घेतील: तानावडे

भाजपचा मोठा फौजफाटा

भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या सूचनेनुसार गोव्यातील प्रचाराची यंत्रणा अत्यंत काटेकोरपणे आखली असून यासाठी मोठा फौजफाटा दिमतीला उतरवला आहे. देशभरातील 400 महत्त्वाचे मंत्री, आमदार आणि नेते सध्या गोव्यात ठाण मांडून आहेत. कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोमई, देवेंद्र फडणवीस, सि.टी रवी, सह प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, दर्शना जरदोश, केंद्रीय निरीक्षक चित्रा वाघ इत्यादी नेत्यांनी नियोजन आखले आहे. भाजपने प्रचार यंत्रणा सक्रियपणे राबवण्यास सुरू केली आहे.

मगोची भिस्त तृणमूलवर

निवडणुकीत प्रथमच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने तृणमूल सोबत युती करत निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. सध्या मगोचे स्थानिक पातळीवरचे नेते प्रचारात सहभागी असले तरी तृणमूलच्या वतीने ममता बॅनर्जी (Mamata Banerjee), माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अभिषेक बॅनर्जी, पवन वर्मा, कीर्ती आजाद, महुआ मोइत्रा, डेरेक ओब्रायन यांच्यासह अनेक नेतेमंडळी प्रचारात उतरणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com