मतविभागणीसाठीच केजरीवाल वारंवार गोव्यात?

काँग्रेसचा आरोप, दिल्ली मॉडेल अपयशी ठरल्याचा निशाणा
Goa Politics News
Goa Politics NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दिल्लीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन मिळत नाही. त्यामुळे ते दिल्लीत आंदोलने करत आहेत. गोव्यात आम आदमी पक्ष एकापाठोपाठ लोकांना खोटी आश्‍वासने देत आहेत. त्यांचे दिल्लीतील मॉडेल निवडणुकीत चालणार नाही. कारण ते दिल्लीत पूर्ण अपयशी ठरले आहेत. राज्यात मतांची विभागणी करून भाजपला लाभ मिळवून देण्यासाठी ‘आप’चे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे वारंवार गोव्यात येत असल्याची टीका दिल्ली काँग्रेस उपाध्यक्ष अली मेहेंदी यांनी केली. (Goa Election News)

Goa Politics News
Goa Election: विविध पक्षांचे 150 हून अधिक 'स्टार प्रचारक' येणार गोव्यात

पणजीतील पत्रकार परिषदेला काँग्रेस (Congress) समितीचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर, महिला अध्यक्षा बीना नाईक, प्रतिमा बांदेकर, फेलिसिया रापोझ, एआयसीसी अल्पसंख्याक विभागाचे गोवा समन्वयक आकाश शाजड उपस्थित होते. यावेळी भाजपवर निशाणा साधताना मेहेंदी म्हणाले की, केजरीवाल यांनी कितीही योजनांच्या घोषणा केल्या तरी त्यांच्या राजकीय डावपेचांना वा आमिषांना गोवेकर बळी पडणार नाहीत. दिल्लीतील ‘आप’चे (AAP) आमदार अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी आहेत. मात्र त्यांच्यावर अजून कारवाई झालेली नाही. गोव्यात काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचा दावा अली यांनी केला.

Goa Politics News
गोवा निवडणुकीनंतर आमचे आमदार थेट राजभवनातच शपथ घेतील: तानावडे

आरोग्य क्षेत्राचा भाजपकडून व्यवसाय

बीना नाईक म्हणाल्या की, भाजपने (BJP) आरोग्य क्षेत्राचा व्यवसाय केला आहे. आजही जुन्या लसी दिल्याचा आरोप त्यांनी भाजप सरकारवर केला. या अप्रभावी लसी आहेत. म्हणूनच डोस घेतल्यानंतरही लोकांना जीव गमवावा लागत आहे. भाजप सरकार जीनोम सिक्वेन्सिंग मशीन वेळेवर मिळवण्यातही अपयशी ठरले. या सरकारला लोकांची काळजी नाही. गोव्यात प्रयोगशाळा नसताना डॉक्टरांना कसे कळले की कोणत्या कोविड प्रकारातील संसर्ग रुग्णाला झाला आहे, असा प्रश्न त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com