Goa Congress: सरकारच्या 'त्या' योजनेला महिला काँग्रेसचा आक्षेप; अध्यक्षा म्हणाल्या,भाजप नेत्याची पत्नी...

सरकार राष्ट्रीयीकृत बँकांकडून खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये पगार वितरणाची व्यवस्था का करत आहे?
Goa Congress
Goa CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Congress मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजनेवर तीव्र आक्षेप घेत गोवा प्रदेश महिला काँग्रेसने शनिवारी राष्ट्रीयीकृत बँक नसलेल्या ॲक्सिस बँकेत खाते उघडण्यास संस्थांना सांगण्यामागील सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

भाजप नेत्याची पत्नी या बँकेच्या उच्च पदावर आहे म्हणून ही खटपट सुरू आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकार ही योजना राबवून स्वत:चा प्रचार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले.

यावेळी उपाध्यक्षा रेणुका देसाई, सरचिटणीस सई वळवईकर, पलेजिया रापोज आणि पणजी महिला गटाध्यक्ष लविनीया दा कॉस्ता उपस्थित होत्या.

Goa Congress
Anjuna Police Drugs Raid: ड्रग्स तस्करी प्रकरणी शापोरा रेस्टॉरंट नंतर 'शिवा व्हॅली'वर पोलिसांचा छापा

नाईक म्हणाल्या की, मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजना, जी अनुदानित शाळांसाठी राबविण्यात येणार आहे आणि त्यांचे वेतन राष्ट्रीयीकृत बँकेतून न करता ॲक्सिस बँकेद्वारे ऑनलाईन पद्धतीने केले जाणार, हे चुकीचे आहे. सरकार राष्ट्रीयीकृत बँकांकडून खासगी क्षेत्रातील बँकांमध्ये पगार वितरणाची व्यवस्था का करत आहे?

आधीच 28 जणांनी भारतातल्या बँका कशा लुटल्या, हे देशाने पाहिले आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी या सरकारने काहीही केले नाही. दहा हजार कोटींहून अधिक पैसे त्यांनी लुटले आहेत, असे नाईक यांनी निदर्शनास आणून दिले.

Goa Congress
Ponda- Sanquelim Municipal Council Election Result: उत्सुकता शिगेला; उद्या 11 वाजेपर्यंत निकाल हाती येणार

त्या म्हणाल्या की, भाजपने काळा पैसा देशात परत आणण्याचे व प्रत्येक भारतीय नागरिकाच्या खात्यात 15 लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते. मग हे पैसे कुठे गेले, अशा प्रश्न नाईक यांनी केला.


‘त्या’ बँकेत भाजप नेत्याची पत्नी
ॲक्सिस बँकेत उच्च पदावर असलेल्या भाजप नेत्याच्या पत्नीला खूश करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे का? अचानक जुनी परंपरा बदलून सरकार खासगी क्षेत्रातील बँकेवर पूर्ण विश्वास कसा ठेवत आहे, असा सवाल बीना नाईक यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com