Drugs Raid
Drugs RaidDainik Gomantak

Anjuna Police Drugs Raid: ड्रग्स तस्करी प्रकरणी शापोरा रेस्टॉरंट नंतर 'शिवा व्हॅली'वर पोलिसांचा छापा

या छाप्यादरम्यान फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी काही पेपर्स जप्त करण्यात आले
Published on

Anjuna Police Drugs Raid दोन दिवसांपूर्वी हुडोवाडो-शिवोली येथे हणजूण पोलिसांनी अमली पदार्थ कारवाईत दोघा संशयितांना अटक केल्याची घटना ताजी असतानाच आज म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या देखरेखीखाली हणजूण पोलिसांनी हणजूण समुद्र किनारी असलेल्या शिवा व्हॅली रेस्टॉरंट (शॅक) येथे छापा टाकला.

आज सायंकाळी 5:00 च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. या छाप्यादरम्यान फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी काही पेपर्स जप्त केल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

 Drugs Raid
Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावर उद्या आंदोलन; कामाच्या संथ गतीचा 'असा' नोंदवणार निषेध

गुरुवारी (ता.4) हुडोवाडो-शिवोली येथे हणजूण पोलिसांनी अमली पदार्थ कारवाईत दोघा संशयितांना अटक केली होती. संशयितांची अधिक चौकशी केली असता हाउस ऑफ शापोरा रेस्टॉरंटमध्ये अंमली पदार्थांचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे गुरुवारी हणजूण पोलिसांनी रेस्टॉरंटमध्ये छापा टाकला होता आणि आता पुन्हा आज हणजूण पोलिसांनी श्वान पथकासहित शिवा व्हॅली रेस्टॉरंट (शॅक) येथे छापा टाकला आहे.

 Drugs Raid
Anjuna Police Drugs Raid: ड्रग्स तस्करी प्रकरणी शापोरातील रेस्टॉरंटवर पोलिसांचा छापा, आली 'ही' माहिती उघडकीस

या छाप्या दरम्यान अमली पदार्थ मिळाले का? या संदर्भात सविस्तर माहिती मिळू शकली नाही. या कारवाईत म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी यांच्या सहित कुलभूषण गुप्ता, पीआय प्रशाल देसाई, पीएसआय साहिल वारंग आणि हणजूण पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. पुढील तपास निधिन वलसन (आयपीएस) यांच्या देखरेखीखाली सुरू आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com