Canal Breach Maharashtra Goa: कालव्यांना फुटीचे ग्रहण! गोव्यातील पाणीपुरवठा खंडित; महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर

Canal Breach Impacts Goa Water: उजव्या कालव्याची जलवाहिनी कोसळून दोन दिवस लोटण्या अगोदरच पुन्हा उजवा कालवा फुटल्याची घटना शुक्रवारी पहाटे कुडासे धनगरवाडी येथे घडली.
Canal Breach Maharashtra Goa:
कालव्यांना फुटीचे ग्रहण! गोव्यातील पाणीपुरवठा खंडित; महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर
Canal Breach Impacts Goa WaterDainik Gomantak
Published on
Updated on

दोडामार्ग: उजव्या कालव्याची जलवाहिनी कोसळून दोन दिवस लोटण्या अगोदरच पुन्हा उजवा कालवा फुटल्याची घटना शुक्रवारी पहाटे कुडासे धनगरवाडी येथे घडली. गतवर्षी ज्या ठिकाणी बांधकाम करण्यात आले होते नेमके त्याच्याविरुद्ध दिशेला कालव्याच्या भिंतीला भगदाड पडले.

कोट्यवधींचा निधी खर्ची घालण्यात येणाऱ्या या कालव्यांना फुटीचे ग्रहण लागल्याने महाराष्ट्र (Maharashtra) पाटबंधारे विभागाचा गलतान कारभार चव्हाट्यावर आला आहे. डावा व उजवा दोन्ही कालवे फुटल्याने गोव्याला (Goa) चालू असलेला पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी खंडित राहणार आहे.

Canal Breach Maharashtra Goa:
कालव्यांना फुटीचे ग्रहण! गोव्यातील पाणीपुरवठा खंडित; महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर
Goa Politics: विरोधी पक्षातून ‘आरजी’ बाहेर! भाजपला पूरक घेतली भूमिका; 2027 ला मोजक्याच जागा लढवणार

कुडाचे धनगरवाडी येथे घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थ आक्रमक झाले. कालव्याच्या भिंतीला पडलेले भले मोठे भगदाड आणि त्यातून बाहेर पडलेला पाण्याचा लोट ग्रामस्थांच्या शेतजमिनीत व बागायतीत घुसला. भेडशी कुडासे रस्त्यावर पाणी आल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. घराच्या अंगणापर्यंत पाण्याचे लोट आलेले पाहून ग्रामस्थ रस्त्यावर धावले. मात्र, रस्त्यावर गुडघाभर पाणी साचून रस्त्याला नदीच्या स्वारूप प्राप्त झाल्याचे दृष्टीस पडतात नेमकाच कालवा फुटला असल्याचा  अंदाज बांधत कालव्याच्या दिशेने धाव घेतली. घटनास्थळी पोहोचतात कालव्याला भगदाड पडल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी लागलीच पाटबंधारे विभागाला ही खबर दिली. यावेळी कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी कोणाळकट्टा विभागाशी संपर्क साधून पाणीपुरवठा बंद करण्याचे आदेश दिल्यावर कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा खंडित केला.

ठेकेदारांवर मेहरबानी का?

तिलारी धरणाच्या कालव्यांची आतापर्यंत करण्यात आलेली कामे मोजक्याच ठेकेदारांना देण्यात येतात. पुन्हा पुन्हा त्याच ठेकेदारांना वारंवार दुरुस्तीची कामे अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहेत. निकृष्ट दर्जाची कामे जरी केलेले असली तरीही पुन्हा त्याच ठेकेदारांना कामे देण्याचे अधिकाऱ्यांचे प्रयोजन काय असते. पाटबंधारे विभागाचे अधिकारी अशा ठेकेदारांवर मेहेरबानी का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केला.

Canal Breach Maharashtra Goa:
कालव्यांना फुटीचे ग्रहण! गोव्यातील पाणीपुरवठा खंडित; महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर
Chandor, Goa: गोव्याची राजधानी राहिलेल्या 'चांदोर'चा कायापालट होणार, वारसा ग्राम म्हणून सरकार करणार विकास; मंत्री फळदेसाईंची माहिती

तर....ते टेंडर रद्द करू

कालव्यांची साफसफाई होत नसल्याने कालवा फुटीचे प्रकार वारंवार घडत असल्याचा प्रश्न उपस्थित झाला. कालव्यावर वाढलेली झाडे स्थानिकांनी डोळ्यादेखत अधिकाऱ्यांना दाखविले. देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला तीस लाख रुपये निधीचे टेंडर काढले जाते. असे असताना देखील कालव्यावर वाढलेल्या झाडांची साफसफाई केली जात नसल्याचा जाब विचारला. यावेळी कालव्यातील पाणी चालू-बंद करण्यासाठी व अन्य देखभालीसाठी निधी असतो आणि त्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी निधी खर्ची घातला जातो. असे कार्यकारी अभियंता जाधव यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com