Goa Rain: मुसळधार पावसामुळे सत्तरीत लाखो रुपयांचे नुकसान!

Sattari News: अग्निशामकच्या जवानांची धावपळ, वीजपुरवठा खंडित
Sattari News: अग्निशामकच्या जवानांची धावपळ, वीजपुरवठा खंडित
Goa Sattari Rain Dainik Gomantak

गेल्या दोन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सत्तरीत अनेक भागात झाडांची पडझड सुरू असून लाखो रुपयांचे नुकसान झाले. वीजतारा, खांबावर झाडे पडल्याने वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला.

शुक्रवारी दुपारी भुईपाल-भेडशेवाडा येथे कल्पना आमोणकर यांच्या घरावर रानटी झाड पडून ५ हजाराचे नुकसान झाले तर २५ हजाराची मालमत्ता अग्निशमन दलाने वाचविली. धावे-सत्तरी येथे आब्यांचे झाड वीज तारांवर व वीज खांबावर पडून दोन वीज पुल जमीनदोस्त झाले. मोठ्या प्रमाणात वीजतारांचे नुकसान झाले आहे.

चरावणे-सत्तरी येथील सरकारी प्राथमिक शाळेजवळ नारळाचे झाड मोडून पडले. कोदाळ सत्तरी येथे संध्याकाळी रस्त्यावर रानटी झाड पडले. तसेच वेळुस वाळपई येथे तुळशीदास झर्मेकर यांच्या घरावर काजूचे झाड पडून ५ हजाराचे नुकसान झाले, तर जवानांनी ४० हजाराची मालमत्ता वाचविण्यात यश आले आहे.

झाडे रस्त्यावर पडत असल्याने अनेक वेळा वाहतुकीवर त्याचा परिणाम झाले. मुसळधार पाऊस पडत असल्याने व झाडांची पडझड सुरू असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांची सध्या धावपळ सुरू आहे. तसेच अनेक वेळा झाडे वीज तारांवर पडत असल्याने वीज खात्यांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान होते आहे.

Sattari News: अग्निशामकच्या जवानांची धावपळ, वीजपुरवठा खंडित
Sattari News : सत्तरीत रस्त्यालगत उगवली पावसाळी नैसर्गिक भाजी

गुरुवारी एकाच दिवशी सत्तरीत ११ ठिकाणी झाडांची पडझड झाली होती. त्यात धामशे-सत्तरी येथे चंद्रकांत आयकर यांच्या घरावर फणसाचे झाड पडून ८० हजारांचे नुकसान झाले, तर दीड लाखाची मालमत्ता वाचविण्यास यश आले. गोळावली-सत्तरी येथे नामदेव गावडे यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून २५ हजाराचे नुकसान झाले आहे, तर ८० हजाराची मालमत्ता जवानांनी वाचवले.

यावेळी सर्व घटनास्थळी वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी टप्याटप्याने घटनास्थळी जाऊन झाडे बाजूला काढून अडथळा दूर केला. अग्निशमनाचे अरविंद देसाई, महादेव गावडे, अशोक नाईक, सत्यवान गावकर, साईनाथ गावस, अविनाश, गंगाराम पावणे, प्रितेश गावडे, कल्मीसकर आदी जवांनी मदर कार्य केले.

Sattari News: अग्निशामकच्या जवानांची धावपळ, वीजपुरवठा खंडित
Sattari Rain : सत्तरीला पावसाचा जोरदार तडाखा; वाहनचालकांची तारांबळ

अनियमित पाणीपुरवठा

सत्तरीतील विविध भागात पाऊस असो किंवा नसो वारंवार व सातत्याने वीजपुरवठा खंडीत होण्याच्या प्रकारात वाढ झालेली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. आता शाळेचे दिवस सुरु असल्याने मुलांना अभ्यासात अडथळा निर्माण होत आहे. शहरीभागा पेक्षा ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाला. एका बाजूने सरकार वीज दर वाढवत आहे, तर दुसऱ्या बाजूने वारंवार वीजपुरवठा खंडित करत आहे. त्यामुळे घरोघरी अडचण निर्माण होत आहे. ही समस्या संबंधितांनी सोडवावी, अशी मागणी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com