Sattari Rain : सत्तरीला पावसाचा जोरदार तडाखा; वाहनचालकांची तारांबळ

Sattari Rain : पिसुर्ले येथील नवदुर्गा मंदिराजवळ रस्त्यावर झाड पडले. सालेली येथे बस थांब्याजवळ झाड पडले, त्याचबरोबर धारखंण येथील हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर झाड पडले. वांते येथे पोलिस आउट पोस्टजवळ रस्त्यावर झाड पडले.
Sattari Rain
Sattari RainDainik Gomantak

Sattari Rain :

वाळपई, अवकाळी पावसामुळे सत्तरी तालुक्यात अनेक भागात पडझड झाली. काही ठिकाणी वीजवाहिन्यांवर तसेच घरांवर झाडे पडून नुकसान झाले. लईराईच्या धोंडांनाही या पावसाच्या फटका बसला.

धाटवाडा, पिसुर्ले येथे शशिकांत गावडे यांच्या घरावर सीताफळाचे झाड पडून सुमारे २० हजाराचे नुकसान झाले. अग्निशमन दलाला ५० हजाराची मालमत्ता वाचविण्यास यश आले. अ़़डवई येथे झांट्ये काजू कारखान्याजवळ आंब्याचे झाड रस्त्यावर पडले. वीज वाहिन्यांचेही नुकसान झाले. सरपंच उदयसिंग राणे यांच्या सहकार्याने अग्निशमन दल व जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील झाड हटवण्यात आले.

घोलवाडा, खोतो़डा येथे जंगली झाड रस्त्यावर व वीज तारांवर पडून नुकसान झाले. भुईपाल येथे रस्त्यावर झा़ड पडले. तसेच मुरमुणे येथे झाड रस्त्यावर पडले. ठाणे येथे रस्त्यावर झाड पडण्याची घटना घडली.

Sattari Rain
Goa Politics: 'धर्म खतरे में है' म्हणत गोव्यात मते मागितली, माघार घेण्यासाठी आरजीचा जन्म नाही झाला- मनोज परब

पिसुर्ले येथील नवदुर्गा मंदिराजवळ रस्त्यावर झाड पडले. सालेली येथे बस थांब्याजवळ झाड पडले, त्याचबरोबर धारखंण येथील हनुमान मंदिराजवळ रस्त्यावर झाड पडले. वांते येथे पोलिस आउट पोस्टजवळ रस्त्यावर झाड पडले.

वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटना स्थळी जाऊन मदतकार्य करत झाडे हटविली व वाहतूक सुरळीत केली. अग्निशमन दलाचे जवान कृष्णा नाईक, तुळशीदास झर्मेकर, आर. गावकर, तसेच ज्ञानेश्वर गावस, दत्ताराम देसाई, महादेव गावडे, कालिदास गावकर, अजय घोलकर, रूपेश सालेलकर, फटी कलमीश्कर आदींनी मदतकार्यात भाग घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com