Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak

Goa Monsoon Update: पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम

गोव्यात (Goa) काल दिवसभर पावसाची (Monsoon) रिपरिप सुरू होती.
Published on

पणजी: गुरुवारी गोव्यात (Goa) राज्यात दिवसभर पावसाची (Monsoon) रिपरिप सुरू होती. पावसाचा जोर वाढून तो पुढील काही दिवस कायम राहील, असे हवामान (Weather) वेधशाळेने म्हटले आहे. राज्यात 5.3 इंच इतक्या पावसाची नोंद झाली. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिली होती. पण, गुरुवारी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू झाली. दुपारी काही काळ विश्रांती घेतली होती. (Light to Moderate spells of rain is likely over North Goa and South Goa districts during the next 3 hours)

Goa Monsoon Update
Goa: कंत्राटदाराच्या अक्षम दुर्लक्षामुळे वाळपाई- फोंडा रस्त्याची वाताहत

सायंकाळी पुन्हा पावसाने जोर धरला असून पुढील चार दिवस कायम असेल. मात्र वेधशाळेने कोणताही इशारा दिलेला नाही. पेडणे आणि सत्तरी भागात दुपारनंतर जोरदार सरी कोसळल्या. गेल्या काही दिवसांपासून वारंवार वेधशाळेच्या अंदाजाला पाऊस हुलकावणी देत आहे.

Goa Monsoon Update
Goa: तार नदीतील गाळ पावसाळ्यानंतरच काढणार; शुभांगी वायंगणकर

दरम्यान राज्यातील नदी नाले ही तुडूंब भरून वाहते आहे. म्हापशातील तार नदीतील गाळ पावसाळ्यानंतरच काढला जाणार, असे म्हापशाच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी स्पष्ट केले आहे. प्रदूषणाबाबत नदीची पाहणी करण्याचा सोपस्कार शासकीय अधिकाऱ्यांकडून पुन्हा एकदा काल गुरुवारी पूर्ण करण्यात आला. या नदीच्या पात्रात असलेल्या खारफुटीच्या झाडांच्या फांद्या पाण्याच्या प्रवाहाला त्रासदायक ठरत असल्याने त्यासंदर्भात वन खात्याची परवानगी घेऊन त्या फांद्या छाटण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, नदीतील गाळ व अन्य माती लवकरात लवकर काढण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com