वाळपई (Walpai) फोंडा (Fonda) वरील मार्गावरील गांजे ते नाणूस दरम्यान पाण्याची मोठी पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेल्या रस्त्यावर वाहने रुतण्यास सुरु झाले असून कंत्राटदाराच्या अक्षम दुर्लक्षामुळे या रस्त्याची वाताहत झाली आहे. एकदम धिम्या गतीने चाललेल्या या कामाला कुणी वालीच राहिला नाही अशी प्रतिक्रिया वाहनचालक व्यक्त करीत आहेत. गेल्या काही महिन्यापासून या रस्त्यावर हे काम चालू आहे .
आज एका ठिकाणी 3 उद्या भलत्याच ठिकाणी अशा प्रकारचे खोदणे चालू असून या प्रकारामुळे अध्या अर्धा रस्ता खराब झाला असल्याने वाहते वाट ने वाहने चालवताना अती दक्षता घ्यावी लागत आहे मध्यानंगी मध्यंतरी थोड्या कामणरा कामगारांना घेऊल घेऊन काम चालू होते त्यात पण सलगता नाही सगळ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राल उच साम्राज्य प्र पसरले आहे.
आता या रस्त्यावर वाहने रुतण्यास सुरु झाली असून काल दुपारी वाळपईहन फोंड्याला जाणारा एक मालवाहू ट्रक GA 06 T 2799 समोरून येणाऱ्या वाहनाला जागा देण्याच्या नादात एका बाजूला पूर्णपणे रुतला अथक प्रयत्न करून सुद्दा सदर माल भरलेला ट्रक वर आला नाही. त्यामुळे या रस्त्यावरून वाहने हाकणे जिकिरीचे बनले आहे संबंधितांनी काही धोक्याच्या ठिकाणी धोका दर्शवीणारा फलक लावला आहे पण ते कमी आहे . संपूर्ण रस्ताच धोकादायक बनला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.