Goa: तार नदीतील गाळ पावसाळ्यानंतरच काढणार; शुभांगी वायंगणकर

तार नदीतील (Tar River) गाळ पावसाळ्यानंतरच काढला जाणार, असे म्हापशाच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर (Shubhangi Waingankar) यांनी स्पष्ट केले आहे.
Shubhangi Waingankar
Shubhangi WaingankarDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: तार नदीतील (Tar River) गाळ पावसाळ्यानंतरच काढला जाणार, असे म्हापशाच्या नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर (Shubhangi Waingankar) यांनी स्पष्ट केले आहे. प्रदूषणाबाबत नदीची पाहणी करण्याचा सोपस्कार शासकीय अधिकाऱ्यांकडून (Government Officers) पुन्हा एकदा आज गुरुवारी पूर्ण करण्यात आला. या वेळी त्या भागाचे आमदार ग्लेन टिकलो (Glenn Tiklo), म्हापशाचे आमदार ज्योशुआ डिसोझा (Joshua D'Souza), माजी नगराध्यक्ष सुधीर कांदोळकर, नगरसेवक तारक आरोलकर, प्रकाश भिवशेट, बस्तोड्याचे सरपंच रणजित उसगावकर, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण आसोलकर, किशोर राव, सलमान खान उपस्थित होते.

या नदीच्या पात्रात असलेल्या खारफुटीच्या झाडांच्या फांद्या पाण्याच्या प्रवाहाला त्रासदायक ठरत असल्याने त्यासंदर्भात वन खात्याची परवानगी घेऊन त्या फांद्या छाटण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, नदीतील गाळ व अन्य माती लवकरात लवकर काढण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.

Shubhangi Waingankar
Goa : 27 वर्षीय कृष्णा तलवारचा वेळसांग समुद्रात बुडून मृत्यू

या पाहणीबाबत माहिती देताना नगराध्यक्ष वायंगणकर पुढे म्हणाल्या, मी सर्व संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते. आजच्या या पाहणीवेळी आरोग्य खाते, जलस्रोत खाते, वीज खाते, सार्वजनिक बांधकाम खाते, बंदर कप्तान खाते, तलाठी तसेच म्हापसा पालिकेचे अधिकारी उपस्थित होते. तथापि, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना कळवूनदेखील ते उपस्थित राहू शकले नाहीत. वास्तविक, त्यांनी या पाहणीवेळी आवर्जून उपस्थित राहणे आवश्यक होते. मुख्य म्हणजे म्हापशातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही या बाबतीत उत्साह दाखवल्याचे त्या म्हणाल्या.

या पाहणीवेळी म्हापसा येथील नागरी आरोग्य केंद्राच्या आरोग्याधिकारी डॉ. शेरल ओलिंडा व आरोग्य निरीक्षक उदय ताम्हणकर तसेच वीज खात्याचे कनिष्ठ अभियंता नॉर्मन आथाइद यांनी काही उपयुक्त सूचना केल्या. तार नदीचा भाग माझ्या मतदारसंघात आहे. या नदीत गणेशविसर्जन केले जाते हे मला माहीत असल्याने ही नदी प्रदूषणमुक्त ठेवून तिचे पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने मी प्रयत्नशील आहे. या बाबतीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मोठी जबाबदारी आहे. या कामासाठी गोवा सरकारच्या विविध खात्यांचा समन्वयही तेवढाच आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com