Margao : पायाभूत स्तरावर मुलांना हसत खेळत शिक्षण देण्याची योजना : मधूश्री

गोमंतक विद्या भारतीतर्फे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर व्याख्यान
Margao : While guiding the parents, Dr. Madhushree Savji
Margao : While guiding the parents, Dr. Madhushree SavjiGomantak Digital Team
Published on
Updated on

मडगाव : पायाभूत शिक्षणावरच अधिक लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पायाभूत शिक्षण हे मातृभाषेतून होणे गरजेचे आह. कारण यामधून मुले विचार चांगल्या प्रकारे करू शकतात. जगाच्या पाठीवर सर्व शिक्षणतज्ज्ञ मंडळी हेच सांगतात, असे मत डॉ. मधुश्री सावजी यांनी मडगावातील विशेष व्याख्यानप्रसंगी व्यक्त केले.

मडगाव येथील सेवा समितीचे आदर्श व्ही. व्ही. विद्यालय व गोमंतक विद्याभारती यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणाच्या पायाभूत स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीवर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

Margao : While guiding the parents, Dr. Madhushree Savji
Margao : मडगावात फेस्ताच्या फेरीतील स्टॉलधारकांना अखेर दिलासा

सेवा समितीच्या नरसिंह दामोदर नायक हॉल पाजीफोंड मडगाव येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून राष्ट्रीय फोकस गटाच्या सदस्या डॉ. मधुश्री सावजी लाभल्या होत्या. यावेळी व्यासपीठावर गोमंतक विद्या भारतीचे संयुक्त सचिव प्रेमानंद नाईक, सेवा समितीच्या आदर्श व्ही. व्ही. विद्यालयाचे अध्यक्ष आश्विनीकुमार नाईक व व्यवस्थापकीय समितीच्या सदस्या रूक्मा सडेकर उपस्थित होत्या.

सावजी पुढे म्हणाल्या, शिक्षणाच्या पायाभूत स्तरावर व त्यापुढील टप्प्यावर मुलांना हसत खेळत शिक्षण देण्याची योजना या शैक्षणिक धोरणात आखली आहे. कुठल्याच प्रकारचा ताण मग तो परीक्षेचा असू किंवा गृहपाठाचा असो मुलांवर येता कामा नये याची पुरेपूर काळजी या शैक्षणिक धोरणामध्ये घेण्यात आली असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

Margao : While guiding the parents, Dr. Madhushree Savji
Margao News : द.प. रेल्वे मार्ग जाणाऱ्या दोन शहरांसह 27 गावांचे सर्वेक्षण

यासाठी वेगवेगळ्या क्रियापद्धती व क्रिडा पद्धतीचा अवलंब करून मुलांना शिक्षण दिल्यास मुलांच्या मनात ते अधिक रुजते. प्रास्ताविक आश्विनीकुमार नाईक यांनी केले. पाहुण्यांची ओळख रूक्मा सडेकर यांनी केली. आभार मुख्याध्यापिका श्वेतलाना बोर्जिस यांनी मानले.

Margao : While guiding the parents, Dr. Madhushree Savji
South Goa Wine Shop Robbery: वास्कोत वाईन शॉपमध्ये चोरीचा प्रयत्न, महिलांची टोळी रेड हँड अटक

छोट्यांना लेखन नको!

आपले शरीर विविध घटकांनुसार बनले आहे. त्यांना किमान स्पर्श होणे आवश्यक आहे, याची या पायाभूत शिक्षण व्यवस्थेत काळजी घेण्यात आली आहे. या पायाभूत व्यवस्थेमध्ये वय वर्ष तीन ते पुढे या वयात लेखनाचा आग्रह न धरता वेगवेगळ्या क्रियाकलाप व चित्रांच्या माध्यमातून शिक्षण दिले, तर अधिक प्रमाणात मुलांना समजते. छोट्या मुलांना लेखनाचा आग्रह करूच नये, असे सावजी यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com