Margao News : द.प. रेल्वे मार्ग जाणाऱ्या दोन शहरांसह 27 गावांचे सर्वेक्षण

आपल्या ताब्यातील व वहिवाटीतील जमिनींची नोंद तयार करणे हा त्यामागील हेतू आहे.
Margao News
Margao NewsGomantak Digital Team
Published on
Updated on

राज्य सरकारने सेटलमेंट व भूमी अधिलेख संचालनालयाला दक्षिण-पश्चिम रेल्वेमार्ग ज्या भागातून जातो, त्या दोन शहरे व 27 गावांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या ताब्यातील व वहिवाटीतील जमिनींची नोंद तयार करणे हा त्यामागील हेतू आहे, असे सूत्रांनी सांगितले.

मुरगाव, सासष्टी, केपे, सांगे व धारबांदोडा तालुक्यांत ही शहरे व गावे मोडतात. मुरगाव तालुक्यात पाले, कासावली, चिखली, दाबोळी, इसोर्शी, आरोशी, वेळसाव, सांकवाळ, सासष्टी तालुक्यातील माजोर्डा, कालात, दिकरपाली, चांदर, दवर्ली, दुकोली. केपे तालुक्यातील शिक शेळवण, असोल्डा, कुडचडे, शेळवण, होडार.

Margao News
G-20 Kashmir: ...अन् थंड कश्मीरमध्ये रामचरणने लावली आग... श्रीनगरमध्ये केला नाटू-नाटूवर डान्स,पाहा व्हिडिओ

सांगे तालुक्यातील सोनावली, करंजोळ. तर धारबांदोडामधील कुळे गावात हे सर्वेक्षण केले जाईल. सरकारी अधिसूचनेनुसार 1968-71 मध्ये या महसुली गावांचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार विविध जमिनींना सर्वेक्षण क्रमांक दिला होता तसेच अधिकारांचे रेकॉर्ड तयार केले होते. द.प. रेल्वेच्या ताब्यातील काही जमिनींचे सर्वेक्षण करून ते आराखड्यात दर्शवलेले असले तरी त्यांना सर्वेक्षण क्रमांक दिलेले नाहीत.

Margao News
Goa Politics : मंत्री, आमदारांमध्ये मतभेद उफाळले; राणे-मायकल आमनेसामने

म्हणूनच त्यांच्या ताब्यातील व वहिवाटीतील जमिनीसंदर्भात फॉर्म डीच्या स्वरूपामध्ये कोणतेही अधिकार नोंदवले गेलेले नाहीत, असे द.प. रेल्वेने अधिसूचनेत म्हटले आहे. म्हणूनच सध्याचे सर्वेक्षण हे संबंधित अधिकारांचे रेकॉर्ड तयार करण्यासाठी हाती घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

rent a car driver attack case
medicine shortage in Goa hospital
Karnataka Island Ownership
Center Sanctioned ₹1,880 Cr for NH-66 4-Laning in South Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com