Goa Liberation Day:...तर गोवा मुक्ती लढ्यातील ते 74 स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा नसते झाले; मुख्यमंत्री सावंत

Goa Liberation movement : गोवा मुक्तीच्या लढ्यात १९५५ ते १९६१ या काळात शहीद झालेल्या १४ स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांचा मुक्ती सोहळ्यात गौरव केला जाणार आहे.
Goa Liberation Day:...तर गोवा मुक्ती लढ्यातील ते 74 स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा नसते झाले; मुख्यमंत्री सावंत
Goa CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Liberation Day

पणजी: गोव्याला देशासोबत १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले असते तर ७४ स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा झाले नसते, असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मुक्तीदिनाच्या पूर्वसंध्येला केले. गोवा १९ डिसेंबर १९६१ रोजी पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाला होता. राज्यात हा दिवस मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोवा मुक्तीच्या लढ्यात १९५५ ते १९६१ या काळात शहीद झालेल्या १४ स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांचा गुरुवारी मुक्ती सोहळ्यात गौरव करणार आहेत. तसेच, सर्वांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य करणार आहेत.

यानिमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सावंत बोलत होते. गोव्याला देशासोबत १९४७मध्ये स्वातंत्र्य मिळाले असते तर ७४ स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा झाले नसते, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष निशाना साधला आहे.

Goa Liberation Day:...तर गोवा मुक्ती लढ्यातील ते 74 स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा नसते झाले; मुख्यमंत्री सावंत
Goa Casino: आता दोन वर्ष No Tension; मांडवीतील कॅसिनोंना 2027 पर्यंत मुदतवाढ

शेषनाथ वाडेकर आणि तुळशीराम हिरवे गुरुजी यांचे कुटुंबीय गोव्याबहेरील असूनही गोवा मुक्तिदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावतात. परंतु गोव्यातील ज्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरी मिळाली आहे ते कधीच या कार्यक्रमाला उपस्थिती लावत नाही ही मोठी खंत आहे. त्यांनीही गोवा मुक्ती कार्यक्रमाला उपस्थिती लावायला हवी, असेही मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

Goa Liberation Day:...तर गोवा मुक्ती लढ्यातील ते 74 स्वातंत्र्यसैनिक हुतात्मा नसते झाले; मुख्यमंत्री सावंत
Goa Crime: घरात घुसून जाळण्याचा प्रयत्न, बदला घेण्यासाठी तरुणाचं कृत्य; कोर्टाने सुनावली ३ वर्षांची शिक्षा

सुमारे ४५० वर्षांच्या पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीतून १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा मुक्त झाला. भारतीय सैनिकांनी राबवलेल्या ऑपरेशन विजयच्या मदतीने पोर्तुगिजांना गोव्यातून हाकलून लावण्यात आले. यादिवशी गोव्यात भारतीय ध्वज फडकावून स्वातंत्र्यदिन साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com