Kiran Kandolkar : 'कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव लोकसभा लढविण्यास इच्छुक'

माजी आमदार किरण कांदोळकर यांनी मंगळवारी कोलवाळ येथे प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
Kiran Kandolkar
Kiran Kandolkar Dainik Gomantak

आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यास मी इच्छुक आहे. तसा आग्रह माझ्या कार्यकर्त्यांचा आहे. मात्र, अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. परंतु सकारात्मक तयारी ठेवली आहे, असे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी मंगळवारी कोलवाळ येथे प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

किरण कांदोळकर म्हणाले की, लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी मी तयारी केली आहे. कार्यकर्त्यांनीही तसा आग्रहच धरला आहे. राहिला प्रश्न कुठल्या पक्षाकडून, ते नंतर ठरविले जाईल. परंतु लोकसभा लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.सध्या मी कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही.

Kiran Kandolkar
Mumbai-Goa Vande Bharat: खुशखबर! वंदे भारत ट्रेन लवकरच मुंबई-गोवा महामार्गावर सुरू होणार, आज चाचणी

तसेच इतर बहुजन समाजातील नेत्यांनी लोकसभेसाठी इच्छा प्रकट केली असली तरी लोकशाहीत प्रत्येकास निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अमूकच नेत्याने निवडणूक लढविली पाहिजे, असे नाही. मी स्वतंत्र नेता असून माझे हे स्वतःचे विचार आहेत, यावर त्यांनी जोर दिला.

Kiran Kandolkar
Siddaramaiah Vs Shivakumar?: उद्या ठरवणार कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री! सोनिया गांधी आणि राहुल घेणार निर्णय

कोणीतरी पुढे यायलाच हवे!

लोकसभा निवडणुकीसाठी जागा आरक्षण नाही. त्यामुळे बहुजन समाजात फूट पडण्याचा प्रश्‍नच येत नाही. जे इच्छुक आहेत ते इतर राजकीय पक्षांचे बहुजन नेते आहेत. मी स्वतंत्र आहे. आतापर्यंत खासदार श्रीपाद नाईक हे कधीही बिनविरोध निवडून आलेले नाहीत. निवडणूक असल्याने कोणीतरी पुढे येणारच, मग मी पुढे आलो म्हणून काय बिघडले, असा सवाल यावेळी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com