Siddaramaiah Vs Shivakumar?: उद्या ठरवणार कर्नाटकचा नवा मुख्यमंत्री! सोनिया गांधी आणि राहुल घेणार निर्णय

Karnataka: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.
Siddaramaiah Vs Shivakumar
Siddaramaiah Vs ShivakumarDainik Gomantak

Siddaramaiah Vs Shivakumar? Next Karnataka CM: कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत अजूनही साशंकता आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांची स्वतंत्रपणे भेट घेतली.

आता यूपीएच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा सल्ला घेणार आहेत. बुधवारी सायंकाळपर्यंत याबाबतची घोषणा होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ही घोषणा बंगळुरुमध्ये केली जाईल.

सिद्धरामय्या आपल्या मुलासह खर्गे यांच्या निवासस्थानी पोहोचले

दरम्यान, मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नवी दिल्लीत (New Delhi) दोन्ही संभाव्य उमेदवार डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची भेट घेतली.

यावेळी सिद्धरामय्या त्यांचे पुत्र यतिंद्र आणि आमदार जमीर अहमद, भैरती सुरेश आणि ज्येष्ठ नेते केजे जॉर्ज यांच्यासोबत खर्गे यांच्या निवासस्थानी पोहोचले.

Siddaramaiah Vs Shivakumar
Karnataka Election Result 2023: मोदींच्या 'मिशन साऊथ' ला मोठा धक्का, 2024 ची लोकसभा निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक?

शिवकुमार म्हणाले - मी ब्लॅकमेलिंग करणार नाही

कर्नाटक काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष डीके शिवकुमार मंगळवारी दिल्लीत पोहोचले. पक्षाची इच्छा असेल तर ते मला जबाबदारी देऊ शकतात.

त्यांना मी आवडो किंवा न आवडो, मी एक जबाबदार व्यक्ती आहे. मी बॅकस्टॅब करणार नाही. मी ब्लॅकमेल करणार नाही, अशी प्रतिक्रीया शिवकुमार यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com