खरी कुजबुज: खाणी सुरू करा; पण..!

Khari Kujbuj Political Satire: जे प्रकल्प पूर्णत्वास पोहचले आहेत आणि गोव्यासाठी हिताचे आहेत, त्याचा विरोध करत संसदेत बोलणे कितपत योग्य ?
Khari Kujbuj Political Satire: जे प्रकल्प पूर्णत्वास पोहचले आहेत आणि गोव्यासाठी हिताचे आहेत, त्याचा विरोध करत संसदेत बोलणे कितपत योग्य ?
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

खाणी सुरू करा; पण..!

राज्यातील खनिज खाणी येत्या हंगामापासून सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे, त्यासाठी बहुतांश खाणपट्ट्यात हालचालीही सुरू झाल्या आहेत, मात्र या खाणींशी संबंधित अनेक दावे-प्रतिदावे सोडवलेले नाहीत. पाळी भागातील एका खाण कंपनीसाठी जमीन मालकांनी आपली जमीन प्लॉटसाठी दिली होती, पण खाणी बंद झाल्यानंतर या जमीन मालकांना भाडेच दिलेले नाही. वास्तविक यासंबंधीचा कायदेशीर तोही कागदोपत्री सरकारी करार असताना जमीन मालकांना न्यायालयात खेचले गेले आहे. इकडे आता खाणी सुरू करण्याची तयारी सुरू आहे, मात्र आपल्या कायदेशीर हक्कांसाठी जमीन मालक न्यायालयात...! या जमीन मालकांचा प्रश्‍न खरे म्हणजे खाण खात्याचा ताबा असलेल्या मुख्यमंत्र्यांनी सोडवायला हवा. बरोबर ना...!∙∙∙

वाहतूक पोलिस अधीक्षकांचा धडाका

राज्यात होणारे अपघात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी वाहन चालकांविरुद्ध धडक मोहीम सुरू करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये जनजागृतीवर अधिक भर देण्यास सुरुवात केली आहे. वाहतूक पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांना राज्याच्या विविध तालुक्यामधील हायस्कूल तसेच विविध घटक क्षेत्रामध्ये जाऊन वाहतूक नियमांची जनजागृती करण्याचे फर्मान काढले आहे. त्यामुळे या विभागाचे अधिकारी या जनजागृतीवर आपली शक्ती खर्च करत आहेत. वाहन चालकांना अपघाताची कारणे तसेच त्यासाठी घ्यायची काळजी याचे धडे दिले जात आहेत. वाहतूक पोलिस विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता हे यासंदर्भात अधिक सक्रिय बनले आहेत. वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यापेक्षा त्यांच्यात अधिकाधिक जनजागृती करण्याचा धडाका लावला आहे. त्यांनी वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. त्यामुळेच तर वाहतूक पोलिस रस्त्यावर जंक्शनवर वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना दिसत आहेत.∙∙∙

अधिकारीच वाहनाला वापरतात ‘टिंटेड ग्लास’ !

मंत्री आणि आमदार यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते आपल्या गाड्यांच्या काचा टिंटेड (काळ्या) करून फिरत असल्याचा मुद्दा बऱ्याच काळापासून गाजत आहे, परंतु आता सरकारी कर्मचारी आणि खासकरून पोलिस कर्मचाऱ्यांनी यात आघाडी घेतल्याचे दिसते. हा प्रकार दिवसाढवळ्या होत असून गोमेकॉत रुग्णवाहिकेसाठी राखीव ठेवलेल्या जागेत एक ‘टिंटेड ग्लास’असलेली गाडी येऊन थांबल्याची दिसली, त्यात हे वाहन घेऊन आलेली व्यक्ती ही ‘थ्री स्टार’ पोलिस अधिकारी असल्याची चर्चा होती. हल्लीच वाहतूक मंत्र्यांनी ‘आरटीओ’चा धाक नसल्याचे विधान विधानसभेत केले होते. मात्र, जेव्हा स्वतः पोलिस अधिकारीच वाहनांना ‘टिंटेड’ काचा लावून फिरतात.स्वतः पोलिस अधिकारी आपण कायद्याच्या वर असल्याचे आपल्या कृतीद्वारे दाखवताना दिसतात. त्यांच्यावर कारवाई होणार, या गोष्टी आता जुन्या झाल्या. तेव्हा राज्यात कायदा आणि व्यवस्था ढासळल्याची टीका विरोधक करताहेत, त्यात तथ्य नाही, कसे म्हणावे?∙∙∙

तुलना खासदारांची

भाजपचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि कॉंग्रेसचे दक्षिण गोव्याचे नवनिर्वाचित लोकसभा खासदार विरियातो फर्नांडिस यांच्या संसदेतील भाषणाची तुलना काही भाजप प्रवक्ते करू लागले आहेत. त्यातही गिरीराज पै वेर्णेकर हे ही तुलना करण्यात पुढे आहेत. खासदार तानावडे कसे गोमंतकीयांचे, एसटी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा विषय संसदेत मांडून वेळेचा सदुपयोग करतात, तर कॉंग्रेसचे खासदार फर्नांडिस तम्नार प्रकल्प आदी विषयावर बोलून वेळ कसा वाया घालवतात. जे प्रकल्प पूर्णत्वास पोहचले आहेत आणि गोव्यासाठी हिताचे आहेत, त्याचा विरोध करत संसदेत बोलणे कितपत योग्य ? असा त्यांचा सवालही त्यांनी केला आहे. वेर्णेकर हे पडद्यामागून भाजपसाठी सूत्रे हलवण्यात पटाईत असल्याने ते जाणीवपूर्वक विरियातोंना डिवचू पाहात असल्याचे बोलले जात आहे. यात कितपत तथ्य आहे, ते वेर्णेकरच जाणोत आणि अशा चर्चा करणारे राजकीय विश्‍लेषकच. ∙∙∙

काँग्रेसला जाग!

एसटीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटेल असे भाजप एसटी मोर्चाचे नेते म्हणायला लागले आहेत. भाजपचे खासदार तानावडे यांनी राज्यसभेत हा मुद्दा मांडला व अचानक कॉंग्रेसचा ‘एसटी’ विभाग खडबडून जागा झाला. या समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, हा मुद्दा कॉंगसनेच उपस्थित केला, असे ते सांगतात. पण २०११ च्या ‘उटा’च्या आंदोलनानंतर कॉंग्रेसचे ‘एसटी’ नेते होते कुठे, असा प्रश्‍न लोक विचारू लागलेत. भाजप एसटी मोर्चानेच हा प्रश्न उचलून धरला. आमचे नेते भाजपमध्ये सामील झाले. आमच्या ‘एसटी’ नेत्यांत ऐक्य नव्हते, अशी कारणे पुढे केली जाताहेत. खासदार कॅ. विरियातो हा मुद्दा उपस्थित करणारच होते, असेही ते सांगतात. पण केव्हा आरक्षण मिळाल्यानंतर का? अशीही विचारणा लोक करू लागलेत. ∙∙∙

टॅक्सीवाल्यांबाबत लोबोंचा कळवळा

टुरिस्ट टॅक्सी व विमानतळ हे दोन्ही विषय आमदार मायकल लोबो यांच्या जिव्हाळ्याचे. कधीही टुरिस्ट टॅक्सी चालकांनी आंदोलन केले तर त्यांच्यासोबत असणारे हे आमदार लोबो नेहमी पुढे असतात. मात्र त्याला अजूनही यश येत नाही. एकेकाळी लोबोंचे भाजपात राजकीय वजन असायचे. मात्र, काँग्रेसमध्ये ते गेले तेव्हापासून त्यांचे भाजपमधील राजकीय वजन कमी झाले. त्यांनी घरवापसी केली तरी त्यांना म्हणावा तसा आदर मिळत नाही. आजही त्यांनी विधानसभेत टुरिस्ट टॅक्सी व दाबोळी विमानतळाचा विषय उपस्थित केला. दिवंगत पर्रीकर यांनी मोपा विमानतळाला मान्यता देताना दाबोळीसंदर्भात दिलेली आश्‍वासने याचा पुनरुच्चार केला. ही आश्‍वासने सध्या हवेत विरत आहेत, असा संशयही व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय विमाने येणे बंद झाल्यास खाणअवलंबितांसारखीच दक्षिण गोव्यातील टॅक्सी चालकांची स्थिती होणार आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: जे प्रकल्प पूर्णत्वास पोहचले आहेत आणि गोव्यासाठी हिताचे आहेत, त्याचा विरोध करत संसदेत बोलणे कितपत योग्य ?
खरी कुजबुज: ...आणि तिजोरीतही खड्डेच खड्डे!

‘ती’ बातमी कुठे गेली?

विधानसभेत हक्कभंग ठराव आणणार,अशी नगरनियोजनमंत्री विश्‍वजीत राणे यांनी केली आणि सगळ्यांना आज सकाळी शेअर करण्यात आलेली ‘हिंदुस्थान टाईम्स’च्या बातमीची लिंक आठवली. गोवा मुक्तीनंतर झालेली भू रुपांतरे आणि आता होणारी भू रुपांतरे याबाबतची तुलना त्यात केली गेली होती. नंतर मात्र ती लिंक उघडणे बंद झाले. ४०४ एरर असा संदेश येऊ लागला. हा मजकूर संकेतस्थळावरून हटवला गेला असावा, असेही वाचायला मिळू लागले. आधी न वाचलेल्यांनाही या बातमीविषयी कुतूहल वाटू लागले. अनेकांनी न उघडणारी लिंकही आपल्या व्हॉटसॲपवर मागवून घेतली. अखेर ती बातमी काय होती, याची चर्चा मात्र समाज माध्यमांवर सुरूच राहिली..∙∙∙

Khari Kujbuj Political Satire: जे प्रकल्प पूर्णत्वास पोहचले आहेत आणि गोव्यासाठी हिताचे आहेत, त्याचा विरोध करत संसदेत बोलणे कितपत योग्य ?
खरी कुजबुज: तिसऱ्या जिल्ह्याची कथा

मार्केट पुराण

काणकोण पालिकेने आज पर्यंत दोन मासळी मार्केट पाहिली.त्यात सध्याचे मासळी मार्केट आहे, त्याठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. या मासळी मार्केटमध्ये यापूर्वी किडे वळवळत होते,आताही तीच स्थिती आहे, असे वारंवार नगरसेवक धीरज नाईक गावकर हे तक्रार करीत आहेत. पण सत्ताधारी गट त्याकडे दुर्लक्ष करीत आला आहे. या मासळी मार्केट परिसरात अत्याधुनिक मासळी मार्केट उभारण्यासाठी पायाभरणी सोहळा सभापतींच्या वाढदिवसादिवशी २७ जुलैला होणार होता. मात्र, हा मुहूर्त पुढे गेला आहे‌. यापूर्वी जुन्या मासळी मार्केटची दुरूस्ती करावी, ही मागणी नगरसेवक करत होते. पण दरवेळी या मासळी मार्केटसाठी अतिरिक्त खर्च कशाला, हे परवलीचे उत्तर नगरसेवकांना दिले जात होते. पण नुकतीच सभापतींच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष सारा नाईक देसाई यांनी क्षत्रिय पागी समाजच्या नगरसेवकांना घेऊन मासळी मार्केटची पाहणी केली. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com