Mashel Panchayat: माशेलात उपसरपंच बदलाचा खेळ, की लोकशाहीची थट्टा? राजकीय नाट्य शिगेला; तीन तासांत अविश्‍वास ठराव

Tivre Vargav Panchayat deputy sarpanch election: माशेल येथील तिवरे-वरगाव पंचायतीत सत्तासंघर्ष वाढला असून, उपसरपंचपदाभोवती ‘संगीतखुर्चीचा खेळ’ सुरू आहे.
Mashel Panchayat
Mashel PanchayatDainik Gomantak
Published on
Updated on

खांडोळा: माशेल येथील तिवरे-वरगाव पंचायतीत सत्तासंघर्ष वाढला असून, उपसरपंचपदाभोवती ‘संगीतखुर्चीचा खेळ’ सुरू आहे. सोमवार, २५ रोजी विरोधी गटातील शिल्पा वेरेकर यांची उपसरपंचपदी निवड झाली. पण अवघ्या तीन तासांतच त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला.

गेल्या महिनाभरापासून ग्रामपंचायतीत सत्ताधारी गट व विरोधक यांच्यातील संघर्ष तापलेला होता. उपसरपंचपदी उचलबांगडी होऊन सत्ता बदल होण्याची चिन्हे होती. सरपंच जयेश नाईक मात्र आपल्या खुर्चीवर कायम राहिले. पण उपसरपंचपद मात्र दिवसेंदिवस अस्थिर झाले असून यामागे ग्रामपंचायतीतील वैयक्तिक गटबाजी, सत्तेसाठीची चढाओढ आणि वैमनस्य ठळकपणे समोर येत आहे.

२५ रोजी झालेल्या उपसरपंच निवड प्रक्रियेत सत्ताधारी गटाकडून एकनाथ परब, तर विरोधी गटाकडून शिल्पा वेरेकर यांनी उमेदवारी दाखल केली होती. मतदानावेळी दोघांना समान म्हणजे ४-४ मते मिळाली. सरपंच जयेश नाईक यांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्याचा आरोपही झाला. शेवटी निर्णय चिट्ठीने घेण्यात आला आणि विरोधी गटाच्या शिल्पा वेरेकर यांच्यावर यशस्वी शिक्कामोर्तब झाले.

Mashel Panchayat
Goa Matoli Vendors: माटोळी बाजारात 'सोपो'चा गोंधळ! जबरदस्‍तीने वसुली, विक्रेत्यांनी सरकारच्‍या नावाने मोडली बोटे

उपसरपंचपदी निवड झाल्याचा आनंद शिल्पा वेरेकर यांनी व्यक्त करण्याआधीच, दुपारी सत्ताधारी गटातील सरपंच जयेश नाईक, एकनाथ परब, संजीव कुंडईकर, अपर्णा आमोणकर आणि यशवंत जल्मी या पंच सदस्यांनी त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला. उपसरपंच म्हणून विश्वास घेतला नाही, अधिकारांचा गैरवापर केला, अशी कारणे ठरावात नमूद करण्यात आली. परंतु ग्रामस्थांच्या मते, अवघ्या तीन तासांत असा आरोप करणे हास्यास्पद व लोकशाहीची थट्टा करणारे आहे.

पुढे काय?

आता चतुर्थीनंतर या नव्या अविश्वास ठरावावर चर्चा होणार असून तेव्हा शिल्पा वेरेकर उपसरपंचपदावर टिकतात की पुन्हा सत्तांतर होते, हे स्पष्ट होणार आहे. मात्र, गेल्या एका महिन्यातील वारंवार झालेले बदल हे ग्रामपंचायतीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.

संगीत खुर्चीचा खेळ!

  • महिनाभरापासून राजकीय गदारोळ कायम

  • उपसरपंच निवड चिट्ठीने – शिल्पा वेरेकरांची निवड

  • अवघ्या ३ तासांत दाखल अविश्वास ठराव

  • ग्रामस्थांत संताप : विकासाऐवजी सत्तेसाठी संगीत खुर्च्यांचा खेळ

  • चतुर्थीनंतर ठरणार नवे समीकरण

Mashel Panchayat
Goa Politics: प्रचंड बहुमत असूनही नाराजीचा सूर वाढतोय, 2027ची निवडणूक 'भाजप'साठी ठरणार कठीण कसोटी

‘विकास थांबणार का?

ग्रामस्थांतून याबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. पंचायत सदस्य केवळ पदांची अदलाबदल करत आहेत; पण गावातील मूलभूत समस्येकडे कुणाचेही लक्ष नाही, अशी भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. पंचायत हा विकासाचा केंद्रबिंदू आहे; पण येथे केवळ राजकीय खुर्च्यांचा खेळ सुरू आहे. गावकऱ्यांच्या पैशावर आणि वेळेवर हा संघर्ष होत असल्याने खरी हानी ग्रामस्थांचीच होत आहे, असे नागरिकांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com