Amit Shah In Goa
Amit Shah In GoaDainik Gomantak

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Amit Shah In Goa: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची गोव्यात होत असलेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शहांसमोर विविध मुद्दे मांडले.
Published on

Amit Shah In Goa

कर्नाटकात राजकीय फायदा मिळवण्यासाठी भाजपने गोव्याच्या हिताशी तडजोड केली हे गोमंतकीयांना पुन्हा एकदा स्पष्ट करा, अशी मागणी करत काँग्रेसने गोव्यात येत असलेल्या गृहमंत्री अमित शहांना तीन प्रश्न केले आहेत.

यात केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादईबाबतच्या मुद्यांचा समावेश आहे.

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी कर्नाटकला म्हादईचे पाणी वळवू दिले जाणार नाही असे म्हटल्याचा दावा करणाऱ्या अमित शहांच्या भाषणाचा व्हिडिओ प्रसिद्ध करून काँग्रेसने भाजपला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न केला.

Amit Shah In Goa
Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

2018 मध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या मालकीच्या कारखान्यातून गोव्यात जप्त करण्यात आलेल्या 100 किलो अत्यंत हानिकारक केटामाइन ड्रगच्या जप्तीच्या चौकशीचा स्टेटस रिपोर्ट बघण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांची गोमंतकीय आतुरतेने वाट पाहत आहेत, असा दुसरा बोचरा बाण काँग्रेसने आपल्या समाजमाध्यमांवरुन मारला.

Amit Shah In Goa
UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

भाजप सरकार गोव्यातील सिद्धी नाईकच्या गूढ मृत्यूची गेल्या 3 वर्षात चौकशी करण्यात अपयशी ठरले आहे. सीबीआय किंवा केंद्रीय तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा ताबा का घेतला नाही आणि तिच्या कुटुंबाला न्याय का दिला नाही, हे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट करावे अशी गोमंतकीयांची इच्छा आहे. हा आहे भाजपच्या बेटी बचावचा विकृत चेहरा, असा तिसरा टोला काँग्रेसने हाणला.

Amit Shah In Goa
Mumbai Goa Highway: ठाकरे गटातील नेत्याच्या हत्येचा प्रयत्न, आमदाराच्या मुलावर आरोप; मुंबई-गोवा महामार्गावरील घटना

काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी पर्यावरणाचा ऱ्हास, कोळसा हब, बेरोजगारी, केंद्रीय अनुदान, महागाई, म्हादई असे सहा मुद्दे उपस्थित केले होते.

भ्रष्टाचार, गुन्हे, आर्थिक मंदी, वित्तीय गैरव्यवस्थापन आणि इतर मुद्दे उपस्थित करत काँग्रेस भाजपच्या विरोधात आक्रमक प्रचार करीत आहे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com