शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने महत्वाचा निर्णय घेतला असून, पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी शिक्षण क्रमांक (Permanent Education Number) देण्यात येणार आहे. शिक्षण अर्थवट सोडाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या क्रमांकाचा फायदा ठरणार आहे.
शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी याबाबत आदेश काढला असून, राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना U-DSE+ च्या (Unified District Information System For Education) पोर्टलवर 11 अंकी कायमस्वरूपी शिक्षण क्रमांक तयार करावा लागणार आहे.
शिक्षण अर्थवट सोडलेल्या विद्यार्थ्यांना या क्रमांकाच्या मदतीने पुन्हा शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मदत होणार आहे.
शिक्षण खात्याच्या आदेशानुसार, सर्व सरकारी, अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण संस्थांना हा क्रमांक विद्यार्थांना द्यावा लागणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थ्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर देखील पर्मनंट एज्यूकेशन नंबर आणि ‘यु -डीआएसई’ कोड असणे आवश्यक करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.