Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

Bodgeshwar Temple Theft: सावंतवाडीतील एका हॉटेलमध्ये चोरटे थांबले असल्याची माहिती मिळाल्यानंतर खोपोली पोलिसांनी तेथून चौघांना अटक केली.
Khopoli Police Raigad
Khopoli Police Raigad

Bodgeshwar Temple Theft

म्हापशातील बोडगेश्वर मंदिरासह गोवा, पुणे, टिटवाळा येथील मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलिसांनी सांवतवाडीतून चौघांना अटक केलीय.

खोपोली येथील बहिर्देव मंदिर, हनुमान मंदिरात झालेल्या चोरीचा तपास करताना पोलिसांनी या चौघांना अटक केली. दरम्यान, चौकशीत त्यांनी गोव्यासह इतर ठिकाणी केलेल्या चोरीची कबुली दिली आहे.

राजू फरत शेख (27, बांगलादेश), इम्रान शहीद शेख (24, सुरत), राकिव कुल मोहम्मद शेख (28, सुरत) आणि मुजाहिद गुलजार खान (28) अशी अटक आरोपींची नावे आहेत. सर्वजण सावंतवाडीतील एका हॉटेलमध्ये राहत असल्याची माहिती खोपोली पोलिसांनी मिळाली.

खोपोली पोलिसांच्या पथकाने तात्काळ कारवाई करत चारही जणांना अटक केली. त्यांच्याकडून सात लाख 2,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

श्री बोडगेश्वर मंदिरातील फंडपेटी फोडून तब्बल 12 लाखांची रोकड लंपास केल्याची घटना २९ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. चोरट्यांनी सुरक्षा रक्षकाला जीवे मारण्याची धमकी देत त्याला खुर्चीला बांधून नंतर मंदिरात चोरी केली होती.

Khopoli Police Raigad
UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

टोळीची विविध मंदिरात चोरी

- पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील जैन मंदिर

- टिटवाळा येथील श्री स्वामी समर्थ मंदिर

- म्हापसा गोवा येथील बोडगेश्वर मंदिर

- खोपोली येथील बहिर्देव मंदिर आणि हनुमान मंदिर

अशा विविध मंदिरातील दान पेट्या फोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com