Kautilya Lekhabhavan: पर्वरीत साकारलंय ‘कौटिल्य लेखाभवन’; जपणार राजवटींचा वारसा

Kautilya Lekhabhavan: 'कौटिल्य लेखाभवन’ असे या इमारतीचे नामकऱण करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 10 नोव्‍हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण होईल.
The Kautilya Lekha Bhavan will preserve the legacy of the rulers
The Kautilya Lekha Bhavan will preserve the legacy of the rulersDainik Gomantak
Published on
Updated on

Kautilya Lekhabhavan: आजवरच्या राजवटींचा वारसा जिवंत ठेवणारी लेखा संचालनालयाची नवीन इमारत सरकारने पर्वरीत उभारली आहे. ‘कौटिल्य लेखाभवन’ असे या इमारतीचे नामकऱण करण्यात आले आहे. शुक्रवार दि. 10 नोव्‍हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण होईल.

The Kautilya Lekha Bhavan will preserve the legacy of the rulers
54th IFFI Goa: ‘भाईजान’च्या उपस्थितीत होणार ‘इफ्फी’चे उद््घाटन

38 कोटी 36 लाख 52 हजार 463 रुपये या इमारतीच्या बांधकामावर खर्च करण्यात आले असून, फर्निचर व इतर कामांवर 4 कोटी 84 लाख 88 हजार 436 रुपयांचा खर्च झाला आहे.

गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने हा प्रकल्प सरकारी मालकीच्या 5 हजार 300 चौरस मीटर भूखंडावर ही इमारत उभी राहिली आहे. गोवा मुक्तीनंतर सरकारने उभारलेल्‍या आकर्षक इमारतींत या इमारतीचा समावेश होतो. विविध राजवटी, राजसत्ता आणि त्यांच्या मुद्रा आदी चित्रांनी ही इमारत आतून सजविण्यात आली आहे.

The Kautilya Lekha Bhavan will preserve the legacy of the rulers
Goa Beach Shack: परवाने मिळाले, तरीही अडथळे

इमारतीत प्रवेश केल्यावर प्राचीन भारतातील अर्थतज्ज्ञ कौटिल्य यांचे चित्र लक्ष वेधून घेते. प्राचीन भारताचा नकाशा देखील या इमारतीच्या दर्शनी भागावर रेखाटण्यात आला आहे. पहिल्या दरवाजावर ‘प्राचीन गोमन्तक’ असे ठळकपणे लिहिण्यात आले आहे. शिवाय विविध राजसत्तांच्या काळातील महत्वाच्या स्थळांची चित्रेही प्रदर्शित करण्यात आलेली आहेत.

सातवाहन राजघराणे

या इमारतीच्या तळघराला सातवाहन राजघराण्याचे नाव देण्यात आले आहे. सातवाहन राजसत्ता आणि त्यांच्या मुद्रा यांची चित्रे या मजल्याच्या भिंतीवर चितारण्यात आली आहेत. ३ हजार १९५ चौरस मीटरचा हा मजला आहे. या तळमजल्यावर ६० कार आणि ५८ दुचाकी वाहने पार्क करण्याची सोय करण्यात आली आहे. इतर सुविधाही या मजल्यावर उपलब्‍ध आहेत. तळमजल्याला चालुक्य राजघराण्याचे नाव देण्यात आले आहे.

The Kautilya Lekha Bhavan will preserve the legacy of the rulers
Goa Accident: मार्ना-शिवोली उतारावर टेम्‍पो उलटला; चालक बचावला!

चालुक्य राजसत्ता आणि त्यांच्या मुद्रा चितारून हा मजला सजवण्यात आला आहे. या मजल्याच्या पंजखणी भागात कोषागार कार्यालय, चंद्रपूर भागात निवृत्तीवेतन विभाग, कुमारद्वीप भागात रोख विभाग, परीशवसू भागात मध्यवर्ती नोंदणी, रायबंदर भागात बॅंक तर मठग्राम भागात उपाहारगृह आहे.

कदंब राजघराणे

पहिल्या मजल्याला कदंब राजघराण्याचे नाव देण्यात आले आहे. कदंब राजघराणे आणि त्यांच्या मुद्रा या मजल्यावर चितारण्यात आल्या आहेत. 1 हजार 898 चौरस मीटरातील या मजल्यावर चंद्रमंडळ भागात संयुक्त संचालकांचे कक्ष, ऋषीवन भागात लेखा तसेच अन्‍य विभाग आहेत.

विजयनगर राजघराणे

इमारतीचा दुसऱ्या मजल्‍याला विजयनगर राजघराण्याचे नाव देण्‍यात आले आहे. या मजल्याच्या शंखवाळ भागात लेखापरीक्षण विभाग, ब्रह्मपुरी भागात कर्ज विभाग, वल्लीपट्टम भागात बिनाराजपत्रित विभाग, लालतालपूरमध्ये भांडार, कुशस्थळीत भविष्य निर्वाह निधी तसेच अन्‍य विभाग आहेत.

मराठा राजघराणे

तिसऱ्या मजल्याला मराठा राजघराण्याचे नाव देण्यात आले आहे. मराठा राजघराणे व मुद्रा या मजल्यावर चितारण्यात आली असून तेथे विविध विभाग आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com