Goa Accident: मार्ना-शिवोली येथील धोकादायक उतारावर ब्रेक फेल झाल्याने मालवाहू टेम्पो समोरच्या कुंपणाला जोरदार धडक देऊन पलटी झाला.
चालक अनिलकुमार (27, उत्तर प्रदेश) याने प्रसंगावधान राखून बाहेर उडी मारल्याने त्याचा जीव वाचला.
ही घटना आज मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. या धोकादायक उतारावर आतापर्यंत अनेक अपघात घडले आहेत.
त्यामुळे वाहतूक खात्याकडून अवजड वाहनांना तेथे बंदी घातली आहे. तरीसुद्धा पहाटेच्या वेळी अनेक अवजड वाहने पोलिसांचा डोळा चुकवून म्हापसा-हाऊसिंगबोर्ड मार्गे धोकादायक उतारावरून मार्ना-शिवोलीत प्रवेश करतात.
त्यामुळे अपघातांची संख्या वाढतच आहे. अपघातग्रस्त टेम्पो दीड ते दोन टन वजनाचा माल घेऊन शिवोलीत येत असताना उतारावर ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरच्या कुंपणाला जोरदार धडक दिली व नंतर पलटी झाला.
टेम्पो आणखी थोडा जरी पुढे गेला असता तर फिलिप फर्नांडिस यांच्या घरात घुसून मोठा अनर्थ घडला असता. स्थानिक पंचसदस्य विलियम्स फर्नांडिस यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघाताची माहिती शिवोली पोलिसांना दिली.
कॉन्स्टेबल रुपेश शेटगावकर व इतरांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व क्रेनच्या साहाय्याने कोसळलेला टेम्पो हटविला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.