Goa Beach Shack: परवाने मिळाले, तरीही अडथळे

Goa Shack Policy: अटींच्या पूर्ततेचे आव्हान : 353 जणांना सोडतीद्वारे शॅकवाटप
Goa Shack Policy
Goa Shack PolicyDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Shack Policy: बहुप्रतिक्षित शॅकवाटप सोडतीची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. सोडतीच्या माध्यमातून राज्यातील एकूण 353 शॅक्सचे वाटप करण्यात आले.

असे असले तरी, शॅक परवाने मिळालेल्यांची अडथळ्यांची शर्यत आजपासून सुरू झाली आहे.

Goa Shack Policy
Goa Accident: मार्ना-शिवोली उतारावर टेम्‍पो उलटला; चालक बचावला!

यंदा शॅक व्यावसायिकांना सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे सयंत्र त्यांना बसवावे लागणार आहे. शिवाय शॅकची जागा सरकारी यंत्रणेकडून आखून घ्यावी लागेल.

शॅकचे काम सुरू करण्यापूर्वी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी घ्यावी लागणार असून बांधकाम पूर्ण झाल्यावर परवाना घ्यावा लागेल.

Goa Shack Policy
Khandepar Bridge: खांडेपार पुलावर अखेर बसवले सीसीटीव्ही कॅमेरे!

किनाऱ्यावरील शॅकसाठी परवाने देण्याचा सोपस्कार पर्यटन खात्याने पार पाडला असला, तरी आता शॅक उभारणीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

जमिनीपासून 1 मीटर उंचीवर शॅक उभारावा लागेल. आजपर्यंत शॅक परवाने कोणाला मिळणार, हे स्पष्ट झाले नसल्याने या साहित्यासाठी कोणी गुंतवणूक केलेली नव्हती.

आता परवाने कोणाला मिळाले, ते स्पष्ट झाल्याने उद्यापासून त्यांना साहित्याची जमवाजमव करावी लागणार आहे. त्यातही पोलाद किंवा लोखंडाचा केवळ 30 टक्के वापर करता येणार आहे.

उर्वरित उभारणी पारंपरिक साहित्याने करावी लागणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पारंपरिक साहित्य मिळवण्यासाठी उद्यापासून परवानाधारकांना धावाधाव करावी लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com