Karnataka High Court: पुराव्यांचा विचार करत कोर्टाचा मोठा निर्णय! माजी आमदार लवू मामलेदार मृत्यू प्रकरणातील संशयिताची याचिका फेटाळली

Lavu Mamledar Death Case: १५ फेब्रुवारी २०२५ रोजी खडेबाजार रोडवर मामलेदार यांच्या कारचा आरोपीच्या ऑटोरिक्षाला किरकोळ स्पर्श झाला होता.
Lavu Mamledar Death Case
Karnataka High CourtDainik Gomantak
Published on
Updated on

बेळगाव: गोव्याचे माजी आमदार तथा निवृत्त पोलिस अधिकारी लवू ऊर्फ सूर्याजी मामलेदार यांच्या मृत्यूप्रकरणातील फौजदारी खटला रद्द करण्यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेण्यात आल्याने न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे.

त्यामुळे या प्रकरणातील आरोपी अमीरसुहैल ऊर्फ मुजाहिद शकीलसाब सनदी (वय २६, रा. सुभाषनगर, बेळगाव) याला उच्च न्यायालयातून कोणताही दिलासा मिळालेला नाही. परिणामी त्याच्याविरुद्ध खुनासह विविध कलमांखाली दाखल असलेल्या गुन्ह्याची सुनावणी बेळगावातील कनिष्ठ न्यायालयात नियमितपणे सुरू राहणार आहे.

Lavu Mamledar Death Case
पंचायतींच्या कारभारात पारदर्शकता येणार; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल! बैठकीचा अजेंडा आणि फाईल्स पाहण्याचा सदस्यांना अधिकार

आरोपी सनदीने स्वतःविरुद्ध सुरू असलेली संपूर्ण न्यायालयीन कार्यवाही रद्द (क्वॉश) करण्यासाठी क्रिमिनल पिटिशन क्र. १०४३२३/२०२५ दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेगडे यांच्या न्यायासनासमोर सुनावणी झाली.

काही काळ युक्तिवाद झाल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. त्यानुसार न्यायालयाने ‘याचिका मागे घेतल्याने ती फेटाळण्यात येत आहे’ असा आदेश दिला. या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ जुलै २०२६ रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी-२) बेळगाव न्यायालयात होणार अाहे.

Lavu Mamledar Death Case
Karnataka Political Crisis: सिद्धरामय्या देणार मुख्यमंत्री पदाचा राजीनामा? दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; डी. के. शिवकुमार यांच्या नावाचा सस्पेन्स वाढला

किरकोळ धडकेतून वाद, त्यानंतर मृत्यू

१५ फेब्रुवारी २०२५ रोजी खडेबाजार रोडवर मामलेदार यांच्या कारचा आरोपीच्या ऑटोरिक्षाला किरकोळ स्पर्श झाला होता. त्यानंतर आरोपीने कारचा पाठलाग करून त्यांना अडविल्याचा आरोप आहे. श्रीनिवास लॉज तेथे शिवीगाळ करत आरोपीने मामलेदार यांच्या कानशिलात लगावल्याने त्यांना गंभीर धक्का बसला. ते घटनास्थळी कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने बीम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मार्केट पोलिसांनी याप्रकरणात गुन्हा नोंदवून तपास पूर्ण केला असून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com