Goa Karnataka Water Dispute: गोमंतकीयांचा पाण्याचा हक्क धोक्यात? म्हादईनंतर आता तिळारीवर नजर; गोव्याच्या पाण्यावर कर्नाटकच्या नव्या दाव्याची चाहूल

Goa Karnataka Water Dispute: गोमंतकीयांचा पाण्याचा हक्क धोक्यात? म्हादईनंतर आता तिळारीवर नजर; गोव्याच्या पाण्यावर कर्नाटकच्या नव्या दाव्याची चाहूल
Goa Karnataka Water Dispute
Goa Karnataka Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: म्हादई नदीच्या पाण्यावरून सुरू असलेला वाद अद्याप कायम असतानाच, आता कर्नाटकाची नजर उत्तर गोव्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या तिळारी धरणातील पाण्यावर लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. बेळगाव शहरातील वाढत्या पाणीटंचाईचे कारण पुढे करत तिळारी धरणातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीत वळविण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली असून, त्यामुळे गोमंतकीयांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बेळगावमधील माजी नगरसेवक संघटनेने चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना निवेदन देत तिळारी धरणातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीत सोडण्याचा प्रस्ताव तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे. या प्रस्तावासाठी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार पाटील यांनी दिले असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांची बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Goa Karnataka Water Dispute
Mandovi River: मांडवीची ओरबाड थांबणार कधी? कॅसिनो, बार्जेस आणि सांडपाण्याने गोव्याच्या जीवनवाहिनीची दयनीय अवस्था

या प्रस्तावानुसार तिळारी धरणातील वीजनिर्मितीनंतर उरणारे अतिरिक्त पाणी राकसकोप धरणात वळवून तेथून मार्कंडेय नदीमार्गे बेळगाव शहर आणि ग्रामीण भागाच्या पाणीपुरवठ्यासाठी वापरण्याची योजना आहे. कर्नाटकात हा प्रश्न पाणीटंचाईचा उपाय म्हणून मांडला जात असला, तरी गोव्याच्या दृष्टीने हा विषय अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

दरम्यान, तिळारी धरण हा केवळ महाराष्ट्राचा प्रकल्प नसून तो गोवा आणि महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प आहे. या धरणाच्या उभारणीसाठी दोन्ही राज्यांनी समान आर्थिक वाटा उचलला असून, उत्तर गोव्यातील अनेक भागांच्या सिंचन, पिण्याचे पाणी आणि भविष्यातील जलसुरक्षेसाठी या प्रकल्पाला मोठे महत्त्व आहे.

Goa Karnataka Water Dispute
Goa Water Crisis: पाण्याच्या संकटाकडे गंभीरपणे पाहणार कधी?

त्यामुळे या धरणातील पाणी अन्यत्र वळविण्याचा कोणताही निर्णय गोव्याच्या हिताला बाधा पोहोचवणारा ठरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, बेळगावला पाणीपुरवठा करण्यासाठी तिळारीचे पाणी वापरण्याची चर्चा नवीन नाही. यापूर्वीही या विषयावर अनेक बैठका, तांत्रिक चर्चा आणि प्रस्ताव मांडले गेले होते. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नव्हती. आता पुन्हा हा विषय पुढे आल्याने गोव्याने सावध भूमिका घेण्याची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com