Churchill Alemao
Churchill AlemaoDainik Gomantak

चर्चिल आलेमाव यांना पुन्हा मतदानयंत्रे हॅक होण्याची भीती

तीन ऐवजी व्हीव्हीपॅट यंत्रातील सर्व स्लिप्सची मोजणी करण्याची मागणी
Published on

मडगाव : आलेमाव कुटुंबातील चारही उमेदवार 2012 च्या निवडणुकीत मतदानयंत्रात केलेल्या मतांच्या फेरफारामुळे पराजित झाले असा कांगावा करणारे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव याना पुन्हा एकदा या निवडणुकीत असाच प्रकार होणार अशी भीती वाटू लागली आहे. त्यामुळे केवळ 3 व्हीव्हीपॅट मशीन मधील स्लिप्सची मोजणी न करता सर्व मशीनमधील स्लिप्सची मोजणी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. (Churchill Alemao News Updates)

Churchill Alemao
गोव्यात पोलिस भरती प्रक्रिया स्थगित ठेवा : काँग्रेस

वार्का येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) यांनी ही भीती व्यक्त केली. ते म्हणाले, मागच्या चार दिवसात असा फेरफार करण्याची तयारी चालू आहे अशी माहिती कानावर पडते. गोव्यात (Goa) सेक्युलर सरकार सत्तेवर येण्यापासून रोखण्यासाठी हे कारस्थान केले जात आहे अशी शंका येते. त्यासाठी लवकरच आपण निवडणूक आयोगाला पत्र लिहून व्हीव्हीपॅटच्या सर्व स्लिप्सची मोजणी करावी अशी मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Churchill Alemao
वार्का खून प्रकरणाच्या तपासाला वेग, सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

2012 च्या निवडणूकीत मतदान यंत्रांमध्ये असाच फेरफार करून आमच्या कुटुंबातील चारही उमेदवारांना पाडण्यात आले होते. त्यावेळी मी हे सांगत होतो पण लोक मला हसत होते. मात्र या यंत्रामध्ये फेरफार केला जाऊ शकतो हे नंतर कित्येक तज्ज्ञांनी स्पष्ट केले असे ते म्हणाले. गोव्यात सेक्युलर सरकार येणार असून त्यात तृणमुलच्या (TMC) आमदारांचा सहभाग असेल असे मतही आलेमाव यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com