

झारखंड: दारु घोटाळा प्रकरणी छत्तीसगडच्या मद्य व्यावसायिक नवीन केडियाला गोव्यातून अटक करण्यात आली. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दारू घोटाळ्याचा तपास करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी (०८ जानेवारी) ही कारवाई केली. नवीन केडियाला ट्रान्झिट रिमांडवर रांचीला नेले जाणार आहे. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी रिमांडवर घेतले जाईल.
दारू घोटाळा प्रकरणात फरार असलेल्या नवीन केडियासाठी एसीबीने अटक वॉरंट जारी केले होते. यानंतर केडियाने न्यायालयात जामीन अर्जही दाखल केला होता.
उत्पादन शुल्क आणि दारूबंदी विभागाचे माजी सचिव विनय कुमार चौबे यांच्या कार्यकाळात, मे २०२२ मध्ये लागू केलेल्या उत्पादन शुल्क धोरणांतर्गत, छत्तीसगडमधील दारू व्यापारी आणि प्लेसमेंट एजन्सींना झारखंडमध्ये काम देण्यात आले.
या व्यापाऱ्यांवर भरघोस कमिशन देऊन झारखंडमध्ये दारु पुरवल्याचा आरोप आहे. दारू व्यापारी नवीन केडिया हा विनय कुमार चौबे यांचा जवळचा असल्याचेही सांगितले जाते. एसीबी आता तपासादरम्यान अधिक माहिती गोळा केल्यानंतर यावर अधिक प्रकाश पडेल. १३ ऑक्टोबर २०२५ पासून नवीन केडियाला सहाव्यांदा अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी, एसीबीने गुजरातमधील अहमदाबाद येथून प्लेसमेंट एजन्सी व्हिजन हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस अँड कन्सल्टंट्सशी संबंधित परेश अभेसिंग ठाकोर, विक्रमसिंग, अभेसिंग ठाकोर आणि महेश शिडगे या तीन आरोपींना अटक केली होती.
एसीबीने १४ नोव्हेंबर रोजी छत्तीसगडमधील विलासपूर येथून मद्यविक्रेते राजेंद्र जैस्वाल उर्फ चुन्नू जैस्वाल याला अटक केली. १३ डिसेंबर रोजी एसीबीने मेसर्स मार्शनचे प्लेसमेंट एजन्सीचे संचालक जगन तुकाराम देसाई यांना ठाणे, महाराष्ट्र येथून अटक केली. आता नवीन केडिया हे अटक झालेले सहावे व्यावसायिक आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.