VIDEO: बाप के साये का असर होता है... रस्त्यावर खेळणी विकणाऱ्या वडिलांच्या पायाला धरुन झोपला चिमुकला; हृदयस्पर्शी व्हिडिओ व्हायरल Watch

Viral Social Media Video: एक व्यक्ती रस्त्यावर खेळणी विक्री करत असून, त्याच्या पायाला बिलगून त्याचा चिमुकला मुलगा अक्षरश: झोपी गेला आहे.
Viral News | Marathi News
Viral Video | Social MediaDainik Gomantak
Published on
Updated on

सोशल मीडिया व्हायरल व्हिडिओ: अलिकडे समाज माध्यमांवर विविध व्हिडिओ व्हायरल होत असतात. डिजिटल क्रांतीमुळे हातात असलेल्या मोबाईलने व्हिडिओ चित्रित करुन ते सोशल मीडियावर शेअर केले जातात. लक्षवेधी व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर शेअर झाल्याने अनेकांच्या ते पसंतीस उतरतात. असाच एक भावनिक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

हातावर पोट असलेल्या, रस्त्यावर वास्तव्य करणाऱ्या अनेकांना पोट भरण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. डोक्यावर ना निवारा, ना कसल्या सरकारी योजनांचा लाभ अशा अवस्थेत रोजच्या अन्नाची भ्रांत असलेली ही लोकं रस्त्यावर, सिग्नलवर, सार्वजनिक ठिकाणी खेळणी विकणे, फुलांची विक्री किंवा इतर व्यवसाय करताना दिसून येतात. असाच एक व्यक्ती रस्त्यावर खेळणी विक्री करत असून, त्याच्या पायाला बिलगून त्याचा चिमुकला मुलगा अक्षरश: झोपी गेला आहे.

Viral News | Marathi News
Goa Fish Pollution: 'त्या अहवालामुळे नागरिकात भीतीचे वातावरण'! करंझाळेतील मच्छीमार आक्रमक; स्पष्टता देण्याची केली मागणी

बाप पोटासाठी कष्ट उपसत आहे तर, मुलगा बापाच्या पायाला बिलगून झोपला आहे. हे दृष्य अनेकांच्या भावनिकतेला हात घालत आहे. बाप - लेकाच्या प्रेमाचा मर्मभेद उलघडून दाखवत आहे तर, अनेकांना पोट भरण्यासाठी उपसाव्या लागणारे कष्ट, समस्या आणि हालआपेष्टांचे दर्शनही घडवत असल्याचे मत नेटकऱ्यांनी मांडले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरत आहे.

Viral News | Marathi News
Goa AAP: ‘आप’ची गोव्यात पडझड का? झेडपी निवडणुकीत झालेले पानिपत कुणामुळे?

या व्हिडिओत हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या दैनंदिन समस्यांबाबत भाष्य केले जात आहे. या शिवाय त्यांच्यामुलांचे होणार हाल त्यांना सोसाव्या लागणाऱ्या हालआपेष्टांबाबतही लोक मतं मांडतं आहेत. दरम्यान, हा हृदयस्पर्शी व्हिडिओ नेमका कोणत्या शहरातील आहे? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

बशीर बद्र यांच्या शब्दात सांगायचे तर,

"बाप के साये का असर होता है,
हर मुसीबत का मुकद्दर होता है।"

नेटकरी देखील अशाच काही प्रतिक्रिया या व्हिडिओवर व्यक्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com