Goa Cricketers in IPL: IPL मध्ये झळकलेत गोव्याचे' '5 स्टार' सुयश 'लाईमलाईट'मध्ये; पडद्यामागील बाकी 4 कोण?

Goan Players in IPL: आजवरच्या १७ पर्वांमध्ये गोव्याच्या केवळ पाचच खेळाडूंनी IPL मध्ये आपली छाप पाडलीये, यांपैकी सुयश तर आपल्याला बऱ्यापैकी माहितीये मग राहिलेले चार खेळाडू कोण?
Goan players in IPL
Goan players in IPLDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cricketers in IPL History

पणजी: सर्वात लोकप्रिय आणि आर्थिकदृष्ट्या तंगड्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १७ व्या पर्वाला २२ मार्च २०२४ पासून चेन्नईमध्ये सुरुवात होणार आहे. आयपीएल म्हणजे फक्त देशातीलच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रेमींसाठी सुद्धा पर्वणीच असते. क्रिकेट म्हणजे किमान भारतात तरी एक धर्मच आहे, देशातील प्रत्येक क्रिकेटपटूचं या स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न असतं पण मोजक्याच खेळाडूंना ही संधी मिळते. तुम्हाला माहितीये का आजवरच्या १७ पर्वांमध्ये गोव्याच्या केवळ पाचच खेळाडूंनी IPL मध्ये आपली छाप पाडलीये, यांपैकी सुयश तर आपल्याला बऱ्यापैकी माहितीये मग राहिलेले चार खेळाडू कोण?

स्वप्नील अस्नोडकर

स्वप्नील अस्नोडकर हे नाव IPL च्या पहिल्या पर्वात म्हणजेच २००८ मध्ये गाजले. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथसोबत सलामीला उतरून तुफानी फटकेबाजी केली. दोघांनी मिळून ४१८ धावांची भागीदारी केली होती. टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडू नवखे असताना, स्वप्नीलने आपल्या आक्रमक शैलीने सर्वांचे लक्ष वेधले. श्रीलंकेच्या रोमेश कालुविथरणाशी त्याची तुलना झाली आणि कर्णधार शेन वॉर्ननेही त्याचे कौतुक केले. 'पॉकेट डायनामाईट' म्हणून प्रसिद्ध झालेल्या स्वप्नीलने २००९ मध्येही राजस्थान रॉयल्सकडून खेळला, पण त्याला खास कामगिरी करता आली नाही.

शदाब जकाती

शदाब जकाती हा गोव्यातील एकमेव खेळाडू आहे ज्याने चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात लायन्स या तीन संघांचे प्रतिनिधित्व केलेय . २००९ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून त्याने IPL मध्ये पदार्पण केले.

Goan players in IPL
IPL 2025: BCCIनं लागू केले नवीन नियम! खेळाडूंना मिळणार नाही 'ही' सुविधा

दक्षिण आफ्रिकेतील खेळपट्ट्यांवर त्याची फिरकी प्रभावी ठरली. त्याने १३ बळी घेतले, ज्यात सलग दोन सामन्यांत चार बळी घेण्याचा पराक्रम केला. २०१० आणि २०११ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विजेतेपद जिंकले, तेव्हाही जकातीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.

सौरभ बांदेकर आणि आदित्य आंगले

सौरभ बांदेकर याने तब्बल ११ वर्षे रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व केलेय, २००९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग होता, पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. २०२१ मध्ये त्याची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या स्काउट म्हणून नियुक्ती झाली. आदित्य आंगले २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या विजयी संघात होता, पण त्यालाही एकही सामना खेळायला मिळाला नाही.

सुयश प्रभुदेसाई

रणजी ट्रॉफीमध्ये गोव्यासाठी सर्वाधिक धावा करणारा सुयश प्रभुदेसाई, तळाच्या फळीत जलद धावा काढण्यासाठी ओळखला जातो. २०२१ पासून तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग आहे. २०२१ मध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही, पण २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध त्याने १८ चेंडूत ३४ धावांची खेळी करून आपली क्षमता दाखवून दिली. सुयश एक चांगला फिनिशर असून तो उत्कृष्ट ॲथलीट आणि पॉवर हिटर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com