Sameer Amunekar
आयपीएलच्या 18व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे.
स्पर्धेचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात रंगणार आहे.
दरम्यान, आयपीएलचा थरार सुरू होण्यापूर्वी, बीसीसीआयने खेळाडू आणि संघांसाठी नवीन नियम लागू केले आहेत.
या हंगामात, खेळाडूंना मागील हंगामाप्रमाणे सूट मिळणार नसल्याचे समोर आले आहे.
रिपोर्टनुसार, सर्व संघातील खेळाडूंना फक्त त्यांच्या टीम बसमधून प्रवास करावा लागेल.
तसेच कुटुंबातील सदस्यांना खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश दिला जाणार नाही.