JioHotstar: IPL पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे? Reliance-Disney JV कडून मोफत स्ट्रीमिंग बंद

IPL Cricket Streaming: इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा सीझन म्हणजेच आयपीएल 2025 मार्चमध्ये सुरु होणार आहे. तत्पूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Reliance-Disney IL
Reliance-Disney JVDainik Gomantak
Published on
Updated on

IPL Cricket Streaming: इंडियन प्रीमियर लीगचा 18 वा सीझन म्हणजेच आयपीएल 2025 मार्चमध्ये सुरु होणार आहे. तत्पूर्वी, एक मोठी बातमी समोर आली आहे. तुम्ही क्रिकेटप्रेमींसाठी असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्वाची आहे. रिलायन्स-डिस्ने संयुक्तपणे इंडियन प्रीमियर लिगचे म्हणजेच आयपीएल क्रिकेट सामन्यांचे मोफत स्ट्रीमिंग थांबण्याच्या तयारीत आहेत. होय, अशी तयारी सुरु असल्याचे रिपोर्ट समोर येत आहेत. रिपोर्टनुसार, रिलायन्स-डिस्नेने एक संयुक्तपणे हायब्रिड मॉडेल स्वीकारले आहे, जिथे एका विशिष्ट मर्यादेनंतर सबस्किप्शन सुरु होईल.

रॉयटर्सच्या मते, रिलायन्स-डिस्ने सबस्क्रिप्शन मॉडेल्स ऑफर करण्यापूर्वी मर्यादित प्रमाणात मोफत पाहण्याची सुविधा देईल. गेल्या वर्षी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स आणि वॉल्ट डिस्ने यांनी त्यांच्या भारतातील मीडिया मालमत्तेचे 8.5 अब्ज डॉलर्सच्या विलीनीकरणानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, 2023 पासून सुरु होणाऱ्या पाच वर्षांसाठी 3 अब्ज रुपयांमध्ये जिओ सिनेमाने या लोकप्रिय स्पर्धेचे राइट्स मिळवल्यापासून मोफत आयपीएल स्ट्रीमिंगला परवानगी दिली आहे.

Reliance-Disney IL
Reliance Jio: आता AI सेक्टरमध्ये होणार क्रांती; जिओने बनवला मास्टर प्लॅन

आयपीएल स्ट्रीमिंग हायब्रिड मॉडेलकडे वळणार

रिपोर्टनुसार, रिलायन्स-डिस्नेने आयपीएलसह त्यांचे सर्व स्ट्रीमिंग कंटेंट एका हायब्रिड मॉडेलमध्ये शिफ्ट करण्याची योजना आखली आहे, जिथे काही काळासाठी मोफत पाहण्याची सुविधा दिली जाईल, नंतर वापरकर्त्यांना त्यांच्या वापराच्या पद्धतींनुसार सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल.

नवीन स्ट्रीमिंग ॲप लॉन्च करणार

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रिलायन्स-डिस्ने संयुक्त उपक्रमाने एक नवीन रीब्रँडेड स्ट्रीमिंग ॲप लॉन्च करण्याची योजना आखली आहे, ज्याची किंमत 149 रुपयांपासून सुरु होईल. स्ट्रीमिंग ऑफर एका नवीन रीब्रँडेड ॲपवर उपलब्ध असेल, जे 149 रुपये ($1.72) पासून सुरु होणारे बेसिक प्लॅन आणि तीन महिन्यांसाठी 499 रुपये ($5.75) मध्ये जाहिरात-मुक्त असेल.

Reliance-Disney IL
20 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप गाठणारी Reliance ठरली पहिली भारतीय कंपनी

रिलायन्स-डिस्ने स्ट्रीमिंग

रिलायन्स-डिस्ने भारतातील 28 अब्ज डॉलर्सच्या मीडिया आणि इंटरटेन मार्केटमध्ये 100 हून अधिक टीव्ही चॅनेल आणि स्ट्रीमिंग ॲप्स चालवतात. जिओसिनेमाकडे आयपीएल क्रिकेटचे राइट्स होते, जे पैसे कमावणारे आणि सर्वाधिक स्ट्रीम केलेले कंटेंट होते. तसेच, विंटर ऑलिंपिक आणि इंडियन सुपर लीग फुटबॉलचेही राइट्स होते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, डिस्नेच्या हॉटस्टार ॲपकडे भारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धा आणि इंग्लिश प्रीमियर लीग सॉकरचे राइट्स होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com