
Indian Premier League 2025 Schedule
अखेर आयपीएल २०२५ चे वेळापत्रक आज रविवारी (१६ फेब्रुवारी) रोजी जाहीर करण्यात आले असून, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ही बहुप्रतिक्षित स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होणार असून देशातील १३ विविध ठिकाणी या स्पर्धेचे सामने रंगणार आहेत.
पहिला सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यात खेळला जाईल. हा सामना कोलकाता येथे खेळला जाईल. याशिवाय, दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण ७४ सामने खेळवले जातील.
आयपीएल २०२५ मध्ये, ५ वेळा विजेते चेन्नई सुपर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना २३ मार्च रोजी खेळला जाईल. स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकाता येथे खेळला जाईल.
आयपीएल २०२५ च्या वेळापत्रकातील नॉकआउट सामन्याचा पहिला क्वालिफायर सामना २० मे रोजी खेळवला जाईल, तर एलिमिनेटर सामना २१ मे रोजी खेळवला जाईल. याशिवाय, क्वालिफायर २ २३ मे रोजी खेळवला जाणार आहे.
क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर सामने हैदराबादमध्ये खेळवले जातील. तर क्वालिफायर २ आणि अंतिम सामना कोलकाता येथे खेळवला जाईल.
आयपीएल २०२५ साठी सर्व फ्रँचायझींनी त्यांच्या संघात मोठे बदल केले आहेत. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात, सर्व संघांनी त्यांच्या संघात अनेक स्टार खेळाडूंना समाविष्ट केले. ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, फाफ डू प्लेसिससारखे स्टार खेळाडू नवीन संघातून खेळताना दिसतील.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.