Khandepar Gramsabha: दक्षता खात्यातर्फे 'त्या' घोटाळ्यांची चौकशी करा!- ग्रामस्थांची मागणी

लाखो रुपयांच्या गैरव्यवहाराचा आरोप; रस्त्यावरील बेकायदा गाड्यांचाही प्रश्‍न
Khandepar Gramsabha
Khandepar GramsabhaDainik Gomantak
Published on
Updated on

Khandepar Gramsabha कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या मागच्या सत्तारुढ पंचमंडळात मजुरांच्याबाबतीत तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्याबाबत आर्थिक घोटाळे झाले असून त्यांची दक्षता खात्यातर्फे चौकशी करा, अशी जोरदार मागणी रविवारी (ता.28) झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी केली.

कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या मागच्या काळात तत्कालीन सरपंच नावेद तहसीलदार यांच्या पंचमंडळाच्यावेळी हा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. हा आर्थिक घोटाळा किती रुपयांचा झाला ते पंचायतीने नेमके शोधून काढावे, असेही ग्रामस्थ म्हणाले.

या ग्रामसभेला सरपंच संजना नाईक, उपसरपंच विल्मा परेरा, पंचसदस्य नीळकंठ नाईक, भिका केरकर, हरेश नाईक, मनीष नाईक, बाबू च्यारी, अभिजीत गावडे, साजिदा सय्यद आदी उपस्थित होते.

या ग्रामसभेला संदीप पारकर, माजी सरपंच गुरुदास खेडेकर, चंद्रकांत होळकर, आबेल तसेच रॉकी डायस, शंकर नाईक व इतरांनी अनेक प्रश्‍न उपस्थित केले. पंचायत सचिव सचिन नाईक यांनी मागील सभेचा अहवाल सादर केला.

Khandepar Gramsabha
Mumbai-Goa Vande Bharat Express: ‘वंदे भारत’ रेल्वे मडगावात दाखल

या ग्रामसभेत कचरा गोळा करण्यासाठी तसेच झुडपे कापण्यासाठी व इतर कामांसाठी मजूर घेतल्याचे कागदोपत्री दाखवले असले तरी तेवढे मजूर कामावर तैनात नाहीत, त्यामुळे लाखोंचा घोटाळा झाला असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.

एवढे मजूर कामावर घेतले तर मग ते कुठे काम करतात, असा सवाल ग्रामस्थांनी केला. त्यावर विद्यमान पंचायत मंडळ निरुत्तर झाले. हे प्रकरण गंभीर असून याप्रकरणी त्वरित दक्षता खात्यातर्फे चौकशी करा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली.

कुर्टी-खांडेपार पंचायत क्षेत्रातील सीसीटीव्ही प्रकरणातही गौडबंगाल आहे. कंत्राटदारामार्फत सीसीटीव्ही खरेदी करणे व ते बसवण्याच्या कामातही मोठा गैरव्यवहार झाला असून याप्रकरणीही दक्षता खात्यातर्फे चौकशी करा, असे नागरिकांनी सांगितले.

Khandepar Gramsabha
एकीकडे मुख्यमंत्र्यांचा 'हर घर नल' योजना 100 पूर्ण केल्याचा दावा, तर राज्याची जलसंकटाकडे वाटचाल

कुर्टी-खांडेपार पंचायतीत अगोदर अकरा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, त्यानंतर नव्याने चौदा कॅमेरे घेण्यात आले. एकूण पंचवीस कॅमेरे पंचायत क्षेत्रात कार्यरत असणे आवश्‍यक असताना केवळ सातच कॅमेरे दिसतात, ते चालतात की नाहीत तेही कुणाला ठाऊक नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला.

प्रत्येक कॅमेऱ्यामागे पंधरा हजार रुपये जास्त दिल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी करून याचीही दक्षता खात्यामार्फत चौकशी करा, असे ग्रामस्थांनी सांगितले. त्यावर पंचायत सचिवांनी याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले.

गाडे पुन्हा रस्त्यावर कसे? : कुर्टी-खांडेपार पंचायतीच्या रस्त्यावर असलेले बेकायदा गाडे त्वरित हटवा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली. त्यावर पंचमंडळाने रस्ते महामार्ग विभागाला यासंबंधी कळवून कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले.

महिन्याभरापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते महामार्ग विभागाने बरेच गाडे हटवले होते; पण आता ते गाडे पुन्हा आहे त्याच जागेवर आले असून त्या लोकांनी धंदा सुरू केला आहे.

Khandepar Gramsabha
Morjim Gramsabha: रस्ता खुला न झाल्यास पुढील घटनेस सरकार जबाबदार; मोरजी ग्रामस्थांचा इशारा

दफनभूमीचा प्रश्‍न

कुर्टीतील दफनभूमीचा प्रश्‍नही बराच गाजला. कुर्टीत हिंदू, मुस्लीम व ख्रिश्‍चनांसाठी स्मशानभूमी देण्यात आली आहे. मात्र, मुस्लिमांच्या दफनभूमीत निश्‍चित जागेचे आरेखन न करता कसे काय कंपाउंड बांधले, असा सवाल करण्यात आला.

आधी ही स्मशानभूमीची जागा तिन्ही धर्मियांसाठी योग्यप्रकारे आरेखन करा आणि तिन्ही स्मशानभूमींसाठी मार्गदर्शिका तयार करून एक समिती नेमा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली, ही मागणी पंचायत मंडळाने मान्य केली.

मलनिस्सारण प्रकल्प नकोच!

नागझरी-कुर्टी येथील हाउसिंग बोर्ड कॉलनीत मलनिस्सारण एसटीपी प्रकल्प येऊ घातला आहे. हे प्रकल्प भर लोकवस्तीत नकोच, असे हाउसिंग बोर्ड व लगतच्या ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे पंचायतीला कळवले आहे.

या प्रकल्पाची नेमकी स्थिती काय आहे ते पाहा आणि हा एसटीपी प्रकल्प किंवा पंपिंग स्टेशन आमच्या भागात नकोच, असा विरोधी स्वर नागरिकांनी लावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com