एकीकडे मुख्यमंत्र्यांचा 'हर घर नल' योजना 100 पूर्ण केल्याचा दावा, तर राज्याची जलसंकटाकडे वाटचाल

मागील काही महिन्यांपासून राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना लोकांना करावा लागत आहे.
Water Crisis in Goa | CM Pramod Sawant
Water Crisis in Goa | CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

Water Crisis in Goa: मागील काही महिन्यांपासून राज्यभरात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईचा सामना लोकांना करावा लागत आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 'हर घर नल' योजना 100 पूर्ण केल्याचा दावा केला असला तरी राज्य जलसंकटाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे राज्यातील धरणांची पाणीपातळी कमालीची घसरल्याने या समस्येत आणखीच भर पडली आहे.

Water Crisis in Goa | CM Pramod Sawant
Mumbai-Goa Vande Bharat Express: ‘वंदे भारत’ रेल्वे मडगावात दाखल

चिखली, पेडणे तालुक्यातील काही भाग आणि पर्वरी येथील रहिवाशांनी जवळपास दोन आठवड्यांपासून नळ कोरडेच असल्याची तक्रार केली आहे. मुरगाव तालुक्यात राहणाऱ्या स्थानिकांनी एकतर अनियमित किंवा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत, तर पेडणे तालुक्यात राहणारे लोक अनेक दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा होत असल्याचे सांगत आहेत.

गेल्या महिन्यात, पर्वरीतील रहिवाशांना पाण्याच्या पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यामुळे 15 दिवसांहून अधिक काळ पाणीटंचाईचा सामना करावा लागला. यामध्ये नागरिकांमध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणात रोष निर्माण होत आहे.

याबाबत पीडब्ल्यूडीचे मुख्य अभियंता संतोष म्हापणे म्हणाले की, विविध ट्रीटमेंट प्लांटमध्ये पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. त्यामुळे लोकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

पेडणे तालुक्यातील काही भागात पाणीटंचाईबाबत माहिती देताना ते म्हणाले की, निवासस्थानांची संख्या वाढल्यामुळे आणि स्थानिकांनी त्यांची जागा भाड्याने दिल्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. आमच्याकडे चांदेल जलशुद्धीकरण प्रकल्प 15 एमएलडी पाणी पुरवतो तर आणखी 15 एमएलडी प्रकल्प सुरू करण्याचे काम सुरू आहे. भूसंपादनाच्या कार्यवाहीमुळे कामाला विलंब झाला होता, जो आता सोडवण्यात आला आहे, त्यानंतर आम्ही अतिरिक्त 15 एमएलडी कमिशन देऊ शकू, ज्यामुळे संपूर्ण पेडणे तालुक्यातील नागरिकांची पाण्याची समस्या कमी होईल.

ही समस्या राज्यातील जवळजवळ सर्वच भागातील असून वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सरकारने सध्याच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करून अतिरिक्त पाणी साठवण टाक्या बांधाव्यात, अशी मागणी सर्वच स्तरातून होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com