Mumbai-Goa Vande Bharat Express: ‘वंदे भारत’ रेल्वे मडगावात दाखल

सुरू होण्याबाबत अस्पष्टता ः पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्‍घाटन शक्य
 Vande Bharat Express
Vande Bharat ExpressDainik Gomantak

देशातील सर्वात जलद रेल्वे म्हणून परिचित असलेल्या आणि त्यासाठी प्रतीक्षा लागून राहिलेली मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन आज मडगाव येथे दाखल झाली. मात्र, तिच्या उद्‍घाटनाची तारीख अजून नक्की न झाल्याने ती सुरू कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी सांगितले, ‘ही रेल्वेगाडी मडगाव स्थानकात आणून ठेवली आहे. मात्र, तिचे उद्‍घाटन कधी होणार याची तारीख आम्हाला अजून कळविली नाही.’

मडगाव येथून सुरू होणाऱ्या या रेल्वेचे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्‍घाटन करणार आहेत. मात्र, त्यासाठी ते प्रत्यक्ष गोव्यात येतील की हे उद्‍घाटन आभासी पद्धतीने ते करणार हेही अस्पष्ट नाही. यापूर्वी मुंबई-गोवा मार्गावर या रेल्वेची चाचणी पूर्ण झाली होती.

 Vande Bharat Express
ST Reservation: 'या' कारणास्तव ‘एसटी’ आरक्षणाला काँग्रेसने दिलाय पाठिंबा

व्यावसायिक समाधानी

देशातील प्रमुख पर्यटन स्थळ असल्याने अनेक देशी तसेच विदेशी पर्यटक गोव्याला पसंती देत असतात. राज्यात पर्यटन वृद्धीसाठी ही गाडी फायदेशीर ठरू शकते.

आता वंदे भारत ही देशातील सर्वात जलद गतीची रेल्वे सुरू होणार असल्याने येथील पर्यटकांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटक पूरक व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 Vande Bharat Express
Goa Beach Party: गोव्याच्या बीचवरील ध्वनी प्रदूषणावर आता 'पोलिश' तंत्रज्ञानाचा वॉच, पुण्यातील कपंनीकडे काम

प्रतितास 160 किलोमीटर प्रवास

सध्या इतर राज्यांतून गोव्याचा कोकण मार्गावरून निघणाऱ्या तेजस एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस या ट्रेनचा प्रवास प्रतितास 110 ते 120 किलोमीटर असा आहे.

मात्र, गोव्याच्या भूमीवर नव्याने अवतारणाऱ्या वंदे भारत या ट्रेनचा प्रवास प्रतितास 160 किलोमीटर असा असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 Vande Bharat Express
Mandrem Water Issue: नेत्यांना आश्‍वासनांचा विसर तर लोकांची पाण्यासाठी वणवण, मांद्रेत पाणी प्रश्‍न काही सुटेना

वंदे भारत एक्स्प्रेस गोव्याच्या कोकण रेल्वे मार्गावरून सुरू झाल्यानंतर राज्यातील ही जलद रेल्वे ठरणार आहे मात्र, ही रेल्वे प्रवासादरम्यान कोठे थांबा घेणार, या विषयीचा निर्णय रेल्वे बोर्ड घेणार आहे. तसेच ही रेल्वे कधी सुरू करायची, हे ते ठरवणार आहेत. या रेल्वेच्या आगमनाची प्रतीक्षा सर्वांना आहे.

- बबन घाटगे, जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com