वैविध्यतेचा सोहळा म्हणून गणला जाणारा 'पर्पल फेस्ट' राजधानी पणजीत होणार आहे. शुक्रवारपासून 08 जानेवारी 2023 दरम्यान हा महोत्सव होणार आहे. दिव्यांग कल्याण आयुक्त, गोवा राज्य समाजकल्याण संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्थेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. दरम्यान, या महोत्सवाची भाग असलेल्या आंतरराज्य अंध क्रिकेट स्पर्धेला पणजी जिमखाना येथे सुरूवात झाली आहे.
समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी या आंतरराज्य अंध क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी राज्याच्या अपंग विभागाचे आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, सचिव, ताहा हजिक, आयजीपी, ओमवीर सिंग बिश्नोई, आणि डॉ. केतन भाटीकर उपस्थित होते.
विकलांग व्यक्तींना सुलभपणे रस्त्यावरून जाता-येता यावे, या उद्देशाने आयनॉक्स कोर्टयार्ड, माकिनेझ पॅलेस आणि जुने गोमेकॉ परिसरातील अडथळे हटवण्याचे काम सुरू आहे. या परिसरातील इमारतींमध्ये सुलभपणे फिरता यावे यासाठी आवश्यक बदल करण्यात येत आहेत.
तीन दिवसीय पर्पल महोत्सवात थेट सादरीकरण, प्रदर्शन, क्रीडा उपक्रम, वैविध्यपूर्ण अनुभवात्मक विभाग आणि सर्जनशील मेळा, असे विविध उपक्रम होणार आहेत. तसेच विविध स्पर्धा, चित्रपटांचे स्क्रीनिंग, मेगा कार रॅली यांसह शिक्षण, रोजगार, पर्यटन आणि स्वावलंबी जीवन याबाबत चर्चात्मक उपक्रमही या महोत्सवात होणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.