Purple Fest: पर्पल फेस्ट’मुळे पणजी दिव्यांगासाठी सुलभ

गुरुप्रसाद पावसकर- शहरातील रस्ते होणार वाहतूक अडथळे मुक्त
Purple Fest
Purple FestDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim: वैविध्यतेचा सोहळा म्हणून गणला जात असलेल्या आणि ६ ते ८ जानेवारी दरम्यान होत असलेल्या ‘पर्पल फेस्ट’मुळे राजधानी पणजी दिव्यांगजनाच्या वावर करण्यासाठी सुलभ झाली आहे. विकलांग व्यक्तींच्या गरजांचा अभ्यास करून शहरातील रस्ते वाहतूक अडथळ्यांपासून मुक्त करण्यात येत आहेत,अशी माहिती दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी दिली.

पावसकर म्हणाले, विकलांग व्यक्तींना सुलभपणे रस्त्यावरून जाता-येता यावे, या उद्देशाने आयनॉक्स कोर्टयार्ड, माकिनेझ पॅलेस आणि जुने गोमेकॉ परिसरातील अडथळे हटवण्याचे काम सुरू आहे. या परिसरातील इमारतींमध्ये सुलभपणे फिरता यावे यासाठी आवश्यक बदल करण्यात येत आहेत.

केवळ ‘पर्पल फेस्ट’पुरताच हा बदल विचारात घेतलेला नाही, तर दीर्घकालीन विचार करून हे बदल केले जातील. विकलांग व्यक्तींसाठी प्रवास सुलभ व्हावा, रस्त्यांवरील हालचाल सहजपणे करता यावी आणि त्यांना सन्मानाने फिरता यावे या हेतूने हे बदल केले जात आहेत,असेही ते म्हणाले.

पर्पल फेस्ट दरम्यान विविध राज्यांतून आलेल्या प्रतिनिधींनी विकलांग व्यक्तींच्या समस्यांबाबत आपण कशा प्रकारे संवेदनशील होऊ शकतो, त्यांच्या समस्यांचे निराकरण करून सर्वसमावेशकतेचे धोरण राबवू शकतो याचा अनुभव येईल.

गोवा राज्य याचे आदर्श उदाहरण ठरेल. यासाठी योग्य बदल करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याबरोबच विविध खात्यांच्या पदाधिकाऱ्यांशी मी स्वतः चर्चा करत आहे. याबाबत शासन स्तरावर सकारात्मक प्रयत्न राबवले जातील,असा विश्वास पावसकर यांनी व्यक्त केला आहे.

Purple Fest
Cleaning Campaign: भुईपालमध्ये स्वच्छता मोहिमेने नववर्षाचे स्वागत

देशभर विकलांगांच्या सर्वसमावेशकता आणि सक्षमीकरणाच्या परिभाषा व्यापक करण्याची गरज आहे. यासाठी या महोत्सवात देशाचे मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचे बीजभाषण करणार आहेत. हल्लीच देशातील न्यायालय इमारतींमध्ये सर्व प्रकारच्या व्यक्तींसाठी शारीरिक आणि कार्यसेवाविषयक सेवा सहज मिळावेत, या उद्देशाने एका समितीचे गठन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com