इनडोको फार्माचा पुन्हा खोडसाळपणा; गोव्यातील नोकरीसाठी महाराष्ट्र, गुजरातमध्ये आयोजित केल्या मुलाखती

Goa Pharma Company: आमच्या संयमाचा अंत पाहू नका! आमदार विजय सरदेसाई यांचा फार्मा कंपनी आणि गोवा सरकारचा सज्जड इशारा.
Goa Pharma Company Interview In Maharashtra
MLA Vijai SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: इनडोको फार्मा कंपनीने पुन्हा एकदा खोडसाळपणा करत गोव्यातील रिक्तपदे भरण्याठी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये जाहीरात प्रसिद्ध केली आहे. गेल्यावर्षी यामुद्दावरुन वाद झाल्यानंतर पुन्हा एकदा कंपनीने जाणूनबुजून तीच चूक केलीय का असा प्रश्न उपस्थि केला जात आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी याप्रकरणी कंपनी आणि राज्य सरकारला गोमंतकीय गृहीत धरण्याची चूक करु नका असा इशारा दिला आहे.

यासाठी १७ ते १८ जून वेर्णा, २२ जून अहमदाबाद - गुजरात, २७ जून बोईसर - महाराष्ट्र आणि २९ जून पुणे - महाराष्ट्र येथे मुलाखती आयोजित केल्या आहेत. यावरुन 'पुरे झाले आता', अशा शब्दात आमदार विजय सरदेसाई यांनी संताप व्यक्त केला आहे.

"स्थानिक अस्तित्वातच नाहीत असे गृहीत धरुन कंपनी गोमंतकीयांना दुर्लक्षित करत आहेत. कमजोर असलेले हे सरकार या कंपनीला थांबविण्यासाठी अपयशी ठरले आहे. गेल्यावर्षी आमच्या दबावामुळे त्यांना मुलाखती रद्द कराव्या लागल्या होत्या," असे विजय सरदेसाई यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Goa Pharma Company Interview In Maharashtra
Corgao: 'सरपंच' निवड करा अन्यथा रस्त्यावर उतरू! कोरगाव पंचसदस्यांचा इशारा; तीव्र आंदोलनाची तयारी

"इनडोको कंपनी आणि राज्य सरकारला आम्ही नोटीस देतोय, गोमंतकीयांना गृहीत धरले जाऊ शकते असं तुम्हा विचार करताय तर पुन्हा विचार करा," असा सज्जड इशारा सरदेसाईंनी दिला आहे.

"आमच्याच भूमीत काम करण्याचा युवकांचा हक्क नाकारला तर आम्ही शांत राहणार नाही. हा अवमान असाच सुरु राहीला तर आम्हाला नाईजास्तव कायदा हातात घ्यावा लागेल आणि गोमंतकीयांना वगळणाऱ्या कंपनीची दारे बेद करावी लागतील. आमच्या संयमाचा अंत पाहू नका!," असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

Goa Pharma Company Interview In Maharashtra
Mangor Hill: मंदिरे, चर्चकडे जाणारी वाहने नौदलाने अडवली! वरुणापुरी-मांगोरहिल येथे भाविक नाराज; MLA साळकर यांच्याकडून मध्यस्थी

"राज्यातील फार्मा कंपनी परराज्यातील उमेदवारांना नोकरी देणार नाहीत, असे आश्वासन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना गेल्यावर्षी २४ मे रोजी दिले होते. यासाठी ठोस धोरण करण्याचे देखील त्यांनी मान्य केले होते. पण, या आश्वासनाचा त्यांना विसर पडल्याचे दिसते. इनडोको फार्मा परराज्यातील उमेदवारांना नोकरी देत आहे. आमच्या भूमीत फायदा कमवणाऱ्या या कंपनी आमच्याच युवकांना रोजगार नाकारत आहे. स्थानिकांना रोजगाराची संधी द्यावी यासाठी सरकारने धोरण निश्चित करावे यासाठी आम्ही सरकारकडे मागणी लावून धरु," असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

Goa Pharma Company Interview In Maharashtra
Bolkarne: ऐन पावसाळ्यात बोळकर्णेत पुलाचे काम, विद्यार्थ्यांची होतेय ‘सर्कस’; शिडीवरून धोकादायक प्रवास

गेल्यावर्षी इंडोको रिमेडिज फार्मा कंपनीच्या विविध पदाच्या नोकरभरतीसाठी मे २०२४ रोजी बोईसर येथे मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच, इनक्युब इथिकल्स या फार्मा कंपनीत दोन पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करत पुण्यातील कोरेगाव पार्कमध्ये मुलाखती आयोजित केल्या होत्या.

यावरुन विजय सरदेसाई, युरी आलेमाव, मनोज परब यांच्यासह विरोधी पक्षातील आमदारांनी जोरदार टीका करत मुलखाती रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. अखेर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करत मुलाखती रद्द करण्याची सूचना केली होती. पण, पुन्हा कंपनीने तीच चूक केल्याने आता मुख्यमंत्री काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com