Corgao: 'सरपंच' निवड करा अन्यथा रस्त्यावर उतरू! कोरगाव पंचसदस्यांचा इशारा; तीव्र आंदोलनाची तयारी

Corgao Sarpanch: नव्याने दिलेली तारीख रद्द केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा कोरगावचे उपसरपंच दिवाकर जाधव यांनी मंगळवार, १७ रोजी पंचसदस्यांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
Corgao Sarpanch selection pending
Corgao Panchayat IssueDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: कोरगाव ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंचपदाची निवड करण्यासाठी तारीख देऊन ती परत परत पुढे ढकलण्याचे राजकारण पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर हे करत असून त्यांनी लोकशाहीची केलेली थट्टा आता बंद करावी.

आता नव्याने दिलेली ७ जुलै ही तारीख रद्द केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा कोरगावचे उपसरपंच दिवाकर जाधव यांनी मंगळवार, १७ रोजी पंचसदस्यांसोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

Corgao Sarpanch selection pending
Corgao Panchayat: 'मुस्‍लीम' असल्‍याने सरपंचपदाला विरोध; कोरगावच्या अब्‍दुल यांना द्यावे लागले देशभक्‍तीचे पुरावे!

या पत्रकार परिषदेला पंचसदस्य कल्पिता कलशावकर, अनुराधा कोरगावकर, नीता नर्से व अब्दुल नाईक उपस्थित होते. दरम्यान, मी सरपंचपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सरपंच निवडीसाठी दोनवेळा दिलेल्या तारखा बदलण्यात आल्या. आता नव्याने दिलेली तारीख बदलल्यास आम्ही आंदोलन करू, असे पंच अब्दुल नाईक यांनी सांगितले.

Corgao Sarpanch selection pending
Corgao: मेगा प्रकल्पांच्या परवानगीवरुन कोरगाव ग्रामस्थ आक्रमक, ग्रामसभेला माहिती देण्याची मागणी

पंचसदस्य अनुराधा कोरगावकर म्हणाल्या की, सरपंच नसल्याने अनेक कामे अडून राहिलेले आहेत. आम्ही सर्व पंचसदस्य हे स्वबळावर निवडून आलेले आहोत आणि आम्ही सर्व भाजपमध्ये आहोत. असे असताना आम्हाला अशाप्रकारची वागणूक का मिळते हे समजलेले नाही. यापुढील दिलेली तारीख रद्द करण्यात आल्यास आम्हाला तीव्र आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com