

वास्को: गोवा राज्यातील सागरी शोध व बचाव (सर्च अँड रेस्क्यू) यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने कोस्ट गार्ड जिल्हा मुख्यालय क्र. ११, गोवा यांच्या वतीने गुरुवारी राज्यस्तरीय सागरी शोध आणि बचाव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत विविध शासकीय विभाग, सुरक्षा यंत्रणा आणि सागरी क्षेत्राशी संबंधित संस्थांच्या प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.
पर्यटन विभाग, सीआयएसएफ, मत्स्य विभाग, मुरगाव बंदर प्राधिकरण, कॅप्टन ऑफ पोर्ट्स, सीमाशुल्क विभाग, किनारी सुरक्षा पोलिस, भारतीय विमानतळ प्राधिकरण, आयओसीएल आणि ओएनजीसी यांसह विविध संस्थांचे अधिकारी उपस्थित होते.
विद्यमान सागरी शोध व बचाव व्यवस्थेचा आढावा घेऊन कार्यपद्धती अधिक परिणामकारक बनविणे, त्रुटी ओळखणे आणि सुधारात्मक उपाययोजना निश्चित करणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यशाळेचे उद्घाटन तटरक्षक पदक विजेते उपमहानिरीक्षक मनोज भाटिया, कमांडर कोस्ट गार्ड गोवा क्षेत्र यांच्या हस्ते झाले.
सागरी आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी विविध यंत्रणांमधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे. अशा कार्यशाळांमुळे उपलब्ध संसाधने, प्रतिसाद क्षमता आणि बचाव व्यवस्थेची अधिक चांगली माहिती मिळते. समुद्रातील मौल्यवान जीवित व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी सर्व संस्थांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.